Uddhav Thackeray : भाजपवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्र्यांच्या तोंडी काँग्रेसचीच भाषा!!


प्रतिनिधी

मुंबई : अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 मेच्या भाषणात भाजपवर प्रखर हल्लाबोल केला, पण मुख्यमंत्र्यांच्या तोंडी सगळी भाषा शिवसेनेऐवजी काँग्रेसचीच होती. शिवसेनेने हिंदुत्व सोडले नसल्याचे त्यांना वारंवार समर्थन करावे लागले. पण संघ स्वातंत्र्यलढ्यात नव्हता. डोक्यावर हिंदूंची भगवी टोपी का घालावी लागते?? हिंदुत्वाची टोपी जर भगवी असेल, तर संघाची टोपी काळी का??, वगैरे सवाल मुख्यमंत्र्यांनी केले. पण हे सवाल शिवसेनेचे नसून काँग्रेसकडून उसने घेतल्यासारखे होते!! While attacking BJP, the language of the Congress is the word of mouth of the Chief Minister !!

उद्धव ठाकरे म्हणाले :

शिवसेनाप्रमुख म्हणायचे देवळात घंटा बडवणारे नको तर अतिरेक्यांना मारणारे हिंदुत्व पाहिजे. गदा पेलली तरी पाहिजे, तुम्ही आमच्यासोबत होतात, आम्ही तुम्हाला सोडून दिले, ते गदाधारी होते, तुमच्या सारख्या गाढवाने लाथ मारायच्या आधीच आम्ही त्यांना लाथ मारली. देशात हिंदुत्वाचे रक्षक भाजपा असे दाखवण्यात येत आहे, मग आम्ही कोण आहोत? कुणाची हिंदुत्वावर घाला घालायची बिशाद आहे बघतोच. १ मे रोजी भाजपाची सभा होती. त्यात ते म्हणाले की, आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. तुमची सतराशे साठ पिढ्या आल्या तरी ते होऊ देणार नाही. १०७ जणांनी हौतात्मे पत्करून ही मुंबई मिळवली आहे.



आता या बीकेसीमध्ये बुलेट ट्रेन येणार आहे. मुंबई-अहमदाबाद अशी ही ट्रेन असणार आहे. हा मुंबई स्वतंत्र करण्याचा डाव आहे. तुमची मातृसंस्था संघ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात संघ होता, तरी स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही त्या लढ्यात नव्हता. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात जनसंघ म्हणून होतात, तेव्हा माझे आजोबा होते, संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली होती. त्या समितीतून पहिले जनसंघ फुटला होता. जागा वाटपावरून ते फुटले.

आमची २५ वर्षे युतीत सडली, पण हिंदुत्वाचा बुरखा फाटल्यावर त्यांचा विकृत चेहरा आम्हाला दिसत आहे. इतक्या वाईट पद्धतीने आमच्या अंगावर येत आहेत. दैनिक सामना मध्ये असा एक लेख दाखवा, ज्यात पंतप्रधानांवर टीका केली आहे. 1974 साली वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते, कारण ७ पैशाने इंधन वाढले होते, मग आता तो भाजप कुठे गेला आहे, जर तेव्हाची बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, तर तेव्हाची वाजपेयी यांची भाजप तरी आहे का?

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत सध्या चिंतन-कुंथन सुरु असते, प्रमोद महाजन होते तेव्हा तिथे जे संस्कार दिले ते आज कुठे भाजपचे दिसत नाही. कुठे गेले आज कुणावर जबाबदारी आहे? खोटे नाटे बोलायचे शिकवतात का? राहुल भट्ट वर कार्यालयात घुसून ठार केले, आता तिकडे जाऊन हनुमान चालीसा म्हणायची का? काश्मीर फाईलचे दुसरे पान आहे का?, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला

भाजपाच्या सभेत भगव्या टोप्या घातल्या होत्या, हिंदुत्व जर भगवी टोपी घालून दाखवत असाल, तर आरएसएसची टोपी भगवी का? आम्ही हिंदू आहेत का, हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. मनोरुग्ण आहेत हे लोक, दुर्दशेकडे आपण जात आहोत.

शरद पवार यांच्यावर कुणी तरी टीका केली, त्या बाईच्या घरात आई-वडील आहेत का, संस्कार वगैरे आहेत का, सुसंसस्कृतपणा जपायला पाहिजे, हे चित्र-विचित्र प्रकार टाळले पाहिजे हे काम आपल्याला करायचे आहे.

दाऊद जर म्हणाला मी भाजपात येतो तर त्यालाही ते मंत्री बनवतील, ज्या हनुमानाने पेटत्या शेपटीने लंका जाळली होती आणि तुमची बाबरी पडली तेव्हा तुमच्या शेपट्या आतमध्ये गेल्या होत्या. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे, तुमचे हिंदुत्व काय आहे??, हे सांगा.

महाराष्ट्र सगळ्या बाबतीत पुढे जात आहे, हे तुम्हाला बघवत नाही. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, बोंबलायचे नुसते, आम्ही संयम बाळगतो म्हणजे आम्ही नामर्द नाही, आम्ही कुणी तुमच्या कुटुंबाची निंदा नालस्ती केली नाही, केवळ सत्ता मिळत नाही म्हणून एकतर्फी प्रेम तुमचे सुरु आहे. म्हणून महाराष्ट्र विद्रुप करू नका. हा सगळा तमाशा बंद करा आणि महाराष्ट्र सुसंकृत करण्यासाठी एकत्र या, असे आवाहन करतो.

राज्यातील प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करायचा आहे, त्याला केंद्र परवानगी देत नाही, आमची मंदिरे पावसाळ्यात पाण्याखाली जातात, त्यांची देखभाल करायची आहे, त्याकडे लक्ष देत नाही पण तोच पुरातत्व विभाग औरंगजेबाच्या कबरीची देखभाल करत आहे, त्यांना जाऊन विचारा.

सगळे अडवून ठेवले आहे. कांजूरच्या जागेची अडवून ठेवली आहे, मराठी भाषेला अभिजात दर्जा देत नाही. अडीच वर्षे उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री म्हणून झाली, अनुभव नसताना सरकार सुरु आहे, मग खोटे गुन्हे लावले, ईडी मागे लावली, मग आम्ही अजिबात गप्प बसणार नाही. कायद्याचा दुरुपयोग करू नका, समोरासमोर येऊन लढा. गलिच्छ राजकारण सोडून द्या.

While attacking BJP, the language of the Congress is the word of mouth of the Chief Minister !!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात