केतकी चितळेची विकृती चिल्लर; पण मराठी नेत्यांचे केवढे मोठे राजकीय भांडवल!!


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी एक विचित्र आणि विकृत काव्य सादर करून केतकी चितळेने आपली चिल्लर विकृती दाखवून दिली. तिच्याविरुद्ध महाराष्ट्रभरातून मोठे रान उठले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिच्याविरुद्ध प्रचंड गदारोळ चालवला आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या आहेत. तिच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे, ती होत आहे. Ketki Chitale’s Deformity Chiller; But what a huge political capital of Marathi leaders

केतकी चितळेने फेसबुक पोस्टवर केलेल्या तथाकथित कवितेचे समर्थन करण्याचे कारणच नाही. ती कविता कोणा भावे नामक व्यक्तीने केली आहे. त्याचे समर्थन करण्याचे अजिबात कारण नाही. ती विकृतीच आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आजाराची अशी खालच्या पातळीवर जाऊन खिल्ली उडवणे पूर्णपणे निषेधार्थ आहे.

– बाळासाहेबांनी सांगितलेली गोष्ट

याबाबत शिवसेनाप्रमुख आणि प्रख्यात व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. बाळासाहेबांनी व्यंगचित्र कलेची व्याख्या सांगताना संबंधित व्यक्तीच्या एखाद्या अवगुणाची अथवा कृतीची तुम्ही जरूर खिल्ली उडवा पण त्याच्या शारीरिक उणीवेची अथवा व्यंगाची खिल्ली उडवणे हा व्यंगचित्रकाराचा अधिकार नाही. ती विकृतीच आहे, असे बाळासाहेबांनी उघडपणे एका मुलाखतीत सांगितले होते.

– निषेध करा, पण एवढी प्रसिद्धी का??

स्वर्गीय बाळासाहेबांचे हेच वक्तव्य केतकी चितळे आणि जो कोणी असेल तो भावे याच्या बाबतीत लागू होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कॅन्सर विषयी अथवा त्यांच्या याविषयी या पद्धतीची विकृत पोस्ट आणि कविता करणे जितके निषेधार्थ आहे, तितकेच या पोस्टचे राजकीय भांडवल करून प्रसार माध्यमांची जागा आडवणे देखील कितपत समर्थनीय आहे?? राष्ट्रवादी पासून भाजपा पर्यंत सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी केतकी चितळेचा निषेध केला आहे. तो निषेध झाला पाहिजे, यात शंका नाही. पण केतकी चितळे जर एवढी चिल्लर आणि विकृत आहे तर तिचा निषेध करून आपण तिला एवढी मोठी प्रसिद्धी का मिळवून देतो आहे??, याचा विचार महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी करायला नको का?? दिवसभर फक्त त्याच्याच बातम्या आणि चर्चा प्रसारमाध्यमांनी ऐकवत राहायच्या का??

केतकी चितळेचे दोन चार मराठी मालिकांमधल्या अभिनया खेरीज योगदान काय?? तिचे प्रसिद्धी मूल्य ते काय?? आणि तिच्या विकृत पोस्टमुळे तिला विरोधक देत असलेली प्रसिद्धी याचे मूल्य काय?? याचा विचार महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी एरवी गप्पा मारणाऱ्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी करायला नको का??

जो उठतो तो केतकी चितळेच्या विकृत पोस्ट विषयी जोरजोरात ट्विट करतो. याची खरेच गरज आहे का?? प्रत्येक पोस्टमध्ये ती कविता कशी वाईट आहे, त्याच्यात कशी विकृती दडली आहे, हे प्रत्येक नेता सांगतो. पण या निमित्ताने त्या विकृत कवितेचा प्रचार-प्रसार होतो या हे या नेत्यांना समजत नाही का?? की त्याच राजकीय भांडवलावर शरद पवारांचे राजकीय मोठेपण त्यांना सिद्ध करायचे आहे??, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही!!

– केतकीला मोठे का करता??

जितेंद्र आव्हाड असोत राज ठाकरे असोत, छगन भुजबळ असोत अथवा बाकीच्या कोणत्याही पक्षांचे वरिष्ठ नेते असोत, या सर्वांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्याएवढी आणि पवारांची कविता हा विषय चर्चेत ठेवण्याएवढी केतकी चितळे किंवा तिची विकृती मोठी आहे का?? तिला दोन-चार थपडा लावल्या किती ताळ्यावर येईल, असे राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या नव्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत मग जी फक्त दोन-चार थपडांची आहे, त्या केतकी चितळेला राज्यव्यापी प्रसिद्धी मिळवून देण्यात काय मतलब आहे??

– राजकीय भांडवल

“निगेटिव्ह पब्लिसिटी इज पब्लिसिटी”, ही साधी गोष्ट महाराष्ट्रातल्या नेत्यांना कळत नाही का?? आणि म्हणूनच वर विचारलेला प्रश्न सयुक्तिक वाटतो आहे, केतकी चितळेची विकृती ही महाराष्ट्रातल्या नेत्यांची राजकीय भांडवल बनले आहे का?? इतकेच काय पवारांचा मोठेपणा दाखवण्यासाठी तोच निकष उरला आहे का?

– सक्षणा सलगरची मुक्ताफळे

या खेरीज एक महत्त्वाचे मुद्दे येथे नमूद करावासा वाटतो. सक्षणा सलगर नावाची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची एक पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटाण्या आणि देवेंद्र फडणवीस यांना फुटाण्या म्हणाली होती. तिचे त्यावेळचे भाषण उपमुख्यमंत्री अजित पवारांना आवडले नव्हते. त्यांनी ते उघडपणे सांगितले होते. पण सुप्रिया सुळे यांनी मात्र कार्यकर्त्यांना असेच भाषण आवडते असे त्याचे समर्थन केले होते. मग ते नेमके काय होते?? सक्षणा सलगरचे भाषण खरंच समर्थनीय होते का?? ते केतकी चितळेने केलेल्या पोस्ट एवढे विकृत नक्कीच नव्हते. पण पंतप्रधानांसारख्या सर्वोच्च पद भूषवणाऱ्या नेत्याविषयी वाटण्या आणि मुख्यमंत्र्यांविषयी फुटाण्या असे म्हणणे कितपत समर्थनीय होते??, याचा विचार त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता का??, हा प्रश्नही या निमित्ताने पडल्यास त्यात कोणाला गैर वाटता कामा नये.

– पवारांचे हातवारे

शरद पवारांनी स्वतः 2019 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधताना तृतीयपंथीयासारखे हातवारे करून “अशांना” मुख्यमंत्रीपदी परत बसवणार का??, असा सवाल केला होता. पवारांच्या निम्म्या वयाचे फडणवीस मुख्यमंत्री होते आणि पवार 80 वर्षी तृतीयपंथीयांसारखे हातवारे करत होते. त्यामागे महाराष्ट्राची कोणती राजकीय संस्कृती होती??

– बाकीचा नेत्यांवरच्या अश्लाघ्य कमेंट

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या विषयी सोशल मीडियावर कोण – कोण आणि किती विकृत पोस्ट करत असते. त्याविषयी राष्ट्रवादीचे नेते किती आघाडीवर राहून टीकास्त्र सोडत असतात?? चंद्रकांत पाटलांना अनेक जण चंपा – चमेली अशी मुक्ताफळे वाहत असतात. ही विकृती नाही तर काय महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे?? जितकी केतकी चितळेची फेसबुक पोस्ट निषेधार्ह आणि विकृत आहे, तितकेच बाकीच्या नेत्यांविषयी अश्लाघ्य उद्गार काढणे, हावभाव करणेही निषेधार्थ आहे. हे येथे निश्चित अधोरेखित केले पाहिजे.

– सर्वपक्षीय नेत्यांना सवाल

आधी उल्लेख केल्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या प्रखर व्यक्तिमत्त्वाने सांगितलेला निकषच येथे फार महत्त्वाचा मानला पाहिजे. राजकीय स्वरूपाची टीका जरूर करा. पण त्यात शारीरिक व्यंगाच्या अथवा कोणत्याही विकृतीच्या गोष्टींना अजिबात स्थान असता कामा नये, हे भान महाराष्ट्रातल्या नेत्यांनी बाळगायला नको का??, हा या निमित्ताने पडलेला कळीचा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दिले पाहिजे.

Ketki Chitale’s Deformity Chiller; But what a huge political capital of Marathi leaders

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात