प्रतिनिधी
मुंबई : आतापर्यंत अजितदादा दोनदा नॉट रिचेबल झाले. नंतर त्याचे वेगवेगळे खुलासे झाले. पण आज सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या दिवशी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कुठे नॉट रिचेबल झालेत?, असा सवाल तयार झाला आहे.Where did the Vice President of the Vidhan Sabha Narahari Ziraval suddenly go?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार पात्र ठरविण्याचा निर्णय कायद्यानुसारच दिला असे म्हणणारे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अचानक नॉट रिचेबल झाले आहेत, तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील आपल्या पूर्वनियोजित दौऱ्यावर गेले आहेत. यातून वेगवेगळ्या राजकीय अर्थ काढले जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या या सत्ता संघर्षाचा गुरुवार ११ मे रोजी अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार राहणार की पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे.
महाराष्ट्राचे विधान सभा अध्यक्ष परदेशात आणि उपाध्यक्ष NOT REACHABLE ? काय हा राजकारणाचा तमाशा — Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 11, 2023
महाराष्ट्राचे विधान सभा अध्यक्ष परदेशात आणि उपाध्यक्ष NOT REACHABLE ? काय हा राजकारणाचा तमाशा
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 11, 2023
अशातच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील आपल्या पूर्वनियोजित दौऱ्यावर गेले आहेत. एकीकडे सत्तासंघर्षाचा निकाल असतांना दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष गायब असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
झिरवळ यांचे दोन्ही फोन फोन लागत नसून ते त्यांच्या गावी दिंडोरीला देखील नाहीत. त्यामुळे झिरवळ गेले तरी कुठे? असा प्रश्न केला जात आहे. सत्ता संघर्षावर दुपारी १२ च्या आत निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असताना झिरवळ नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App