ट्रेनिंगला कधी येऊ? मोफत शिकवणार की फी घेणार?, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी मधील नेते सरकारवर टीका करत आहेत. यामध्ये काही वेळा मिश्कील टिप्पणी होत असल्याचे देखील पहायला मिळत आहे. असाच गंमतीदार वाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात पहायला मिळत आहे. When to come to training? Will you teach for free or charge a fee?

एकटे देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कसे काय सांभाळणार?, असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला होता. त्यावरुन मी अजित पवारांना गुरुमंत्र देईन, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले होते. त्यांच्या याच उपरोधिक टीकेची अजित पवार यांनी परतफेड केली आहे.

मी त्यांना पत्र पाठवतो

मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तुमच्याकडे ट्रेनिंग घ्यायला कधी येऊ?, हे विचारणार आहे. या ट्रेनिंगला फी लागणार आहे की मोफत होणार आहे?, ते पण मी विचारणार आहे. त्याप्रमाणे फडणवीसांशी हितगूज करुन माझ्या ज्ञानात भर घालतो, असे मिश्कील उत्तर अजित पवार यांनी फडणवीसांना दिले आहे.



काय म्हणाले होते फडणवीस?

येत्या काळात कधी त्यांचं राज्य आलंच आणि त्यांच्याकडे दोन-तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली तर ती कशी पार पाडायची याचा गुरुमंत्र मी अजित पवारांना नक्की देईन. मात्र नियोजन मंत्री म्हणून हे जिल्हे माझ्याकडे आहेत. आणि मी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला आहे, मग सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना टोला लगावला होता.

अजित दादांचे विधान

माझ्याकडे केवळ एका पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं तेव्हा तो एक जिल्हा सांभाळताना माझ्या नाकीनऊ येत होते, आता फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद असून ते या सर्व जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार, असा खोचक सवाल अजित पवार यांनी फडणवीसांना केला होता.

त्यावर अजितदादांनी फडणवीस ट्रेनिंग मोफत घेणार आणि ट्रेनिंग कधीपासून सुरू होणार असे प्रश्न विचारून नुसती मिश्किल टिप्पणी केली आहे? की फडणवीस यांना आपल्याला ट्रेनिंग देण्याची खास ऑफरच दिली आहे?, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

When to come to training? Will you teach for free or charge a fee?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात