राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सध्या मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाय, या भेटीवरून विविध तर्कवितर्कही लावले जात आहेत. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची सर्वांना उत्सुकता होती. असे असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. What was discussed with Raj Thackeray Chief Minister Shinde himself gave the information
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे सांगितले आहे की, ‘’महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न तसेच बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात स्थानिक रहिवाशांचे प्रश्न तसेच सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट केले.’’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष @RajThackeray यांनी आज वर्षा निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न तसेच बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात स्थानिक रहिवाशांचे प्रश्न तसेच… pic.twitter.com/vGPbmYm0e7 — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 7, 2023
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष @RajThackeray यांनी आज वर्षा निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न तसेच बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात स्थानिक रहिवाशांचे प्रश्न तसेच… pic.twitter.com/vGPbmYm0e7
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 7, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात महाबंडखोरी झाल्यानंतर व अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे, अशी मागणीही हळूहळू जोर धरू लागली आहे. मुंबईत तर अनेक ठिकाणी मोठाले होर्डिंग्जही झळकले आहेत. त्यात नुकतच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मनसेचे अभिजीत पानसे यांची भेट झाली होती. शिवाय संजय राऊत यांनीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं रक्ताचं नातं आहे, त्यांना एकत्र आणण्यासाठी इतर कुणाची आवश्यकता नाही, असं म्हटलं होतं त्यामुळे चर्चांनी अधिकच जोर धरला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App