फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी काय केले??, वाचा आणि ऐका मराठा नेते आणि कार्यकर्त्यांचीच वक्तव्ये!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनोज जरांगेंनी जरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवराळ भाषा वापरत खालच्या पातळीवरची टीका केली असली तरी, प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी नेमके काय केले??, याचा स्पष्ट खुलासाच मराठा राजकीय आणि सामाजिक नेते आणि कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर केला आहे. यामध्ये मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील असोत, की छत्रपती उदयनराजे भोसले असोत, सर्वांनीच देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणातील योगदान मान्य केले आहे!! What did Fadnavis do for Maratha reservation

यामध्ये ज्येष्ठ अभ्यासक – विचारवंत सदानंद मोरे, ज्येष्ठ वकील एडवोकेट श्रीराम पिंगळे कै. विनायक मेटे त्याचबरोबर स्वतः विद्यमान मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रपती नियुक्त माजी खासदार संभाजी राजे छत्रपती या सर्वांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा अतिशय गौरवपूर्ण शब्दांमध्ये उल्लेख केला आहे.

कायदेशीर पूर्तता फडणवीसांनीच केली

2013 पासून मराठा आरक्षणाचा विषयामध्ये एडवोकेट श्रीराम पिंगळे आणि विनोद पाटील लक्ष घालत आहेत. कायदेशीर बाबींमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अतिशय प्रामाणिकपणे मदत केल्याचे त्यांनी आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणी नमूद केले. मराठा आरक्षणात ज्या कायदेशीर अडचणी होत्या, त्या सोडवण्यासाठी विशेषत: मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्या सर्व कायदेशीर बाबी सरकारी पातळीवर करणे आवश्यक होते त्या सर्व बाबींची पूर्तता देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात केलेला मराठा आरक्षण कायदा मुंबई हायकोर्टात टिकला. सुप्रीम कोर्टातही टिकला परंतु दुर्दैवाने सरकार बदलले आणि तो कायदा सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही, याची आठवण विनोद पाटलांनी आवर्जून सांगितली.

फडणवीसांची प्रामाणिक भावना

त्याचवेळी ज्येष्ठ अभ्यासक आणि विचारवंत सदानंद मोरे यांनी मराठा आरक्षण विषयांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कसे जातीने लक्ष घातले, याची आठवण सांगितली. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे. त्यांना आरक्षणाची गरज आहे या कर्तव्यभावनेतूनच आपण फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन त्यांना सर्व ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी पुरवण्याची मदत केली. त्यावेळी मराठा समाजातल्याच काही लोकांनी फडणवीसांना मदत करा करू नका म्हणून आपल्याला सांगितले होते. परंतु, एक अभ्यासक म्हणून मला ते कर्तव्य करावेसे वाटले. ते मी केले. फडणवीसांचा मला नेहमीच अतिशय प्रामाणिक पाठिंबा राहिला. माझ्या प्रत्येक मेसेजला त्यांनी उत्तर दिले. शासकीय पातळीवर जी मदत मी मागितली ती फडणवीस यांनी तत्परतेने उपलब्ध करून दिली. त्यांचा पूर्ण प्रामाणिक हेतू मला जाणवल्यानेच मी त्या कामात सहभागी झालो, अशी आठवण सदानंद मोरे यांनी सांगितली.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण हायकोर्टात टिकले होते. आज ते उपमुख्यमंत्री आहेत. तेव्हा देखील त्या विषयात ते प्रामाणिक काम करतात, असे छत्रपती संभाजी राजे यांनी स्पष्ट केले. विद्यमान उपमुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्या काळातले विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील फडणवीसांची मराठा आरक्षणातील कामगिरी मोकळेपणाने मान्य केली.

छत्रपती उदयनराजे यांनी तर त्या पलीकडे जाऊन आत्तापर्यंत जे मराठा राज्यकर्ते होऊन गेले त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय केले??, असा सवाल केला. नुसतीच मराठा आडनावे लावून त्यांनी मराठा राजकारण केले, पण फडणवीस यांनी मराठा नसताना मराठा समाजाला आरक्षण दिले, अशी परखड भूमिका उदयनराजे यांनी मांडली.

आज जरी मनोज जरांगे फडणवीसांच्या नावाने शिवराळ भाषेत खडे फोडत असले तरी प्रत्यक्षात मराठा समाजातल्या नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी फडणवीस यांनी केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन त्यांचे उघड समर्थन केले. ते आता वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून समोर येत आहे.

What did Fadnavis do for Maratha reservation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात