उद्योगांना त्रास देणाऱ्या घटकांना ठोकून काढू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

Devedra Fadanvis

विशेष प्रतिनिधी

अहिल्यानगर : महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये उद्योग आले पाहिजेत त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रयत्नांना उद्योजक सुद्धा प्रतिसाद देत आहेत ते महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत, पण काही घटक मात्र उद्योगांना त्रास देत असतील, तर त्यांना ठोकून काढू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.We will crack down on those who are troubling industries; Chief Minister Devendra Fadnavis warns

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर मध्ये तौरल इंडिया-सुपा प्लांट’चे भव्य उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात उद्योजक गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करत आहेत त्यांना सगळ्यांनी सहकार्य केले पाहिजे. त्यांच्या कामात अडथळा आणता कामा नये. पण काही घटक जर कामात अडथळा आणत असतील, तर ते अडथळे सुद्धा सरकार म्हणून दूर करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले



विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, सांसद डॉ. भागवत कराड, तौरल इंडियाचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते, ह.भ.प. नामदेवशास्त्री महाराज, ह.भ.प. शिवाजी महाराज आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तौरल इंडिया-सुपा प्लांटच्या यंत्रसामग्रीची पाहणी करत माहिती घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘तौरल इंडिया-सुपा प्रकल्प’ च्या कोनशिलेचे आणि ‘ॲल्युमिनियम मॅन’ पुतळ्याचे अनावरण देखील झाले.

यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. भागवत कराड, तौरल इंडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते व इतर मान्यवर उपस्थित होते.

We will crack down on those who are troubling industries; Chief Minister Devendra Fadnavis warns

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात