विशेष प्रतिनिधी
मुबंई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने आता तीव्र रूप धारण केले आहे. राज्यातील सुमारे 2000 हून अधिक कर्मचारी निलंबित झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर भाजपमधील बऱ्याच मोठ्या नेत्यांनी या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाच्या इतर काही नेत्यांनी एस टी कर्मचार्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग घेतला आहे. भाजप नेते नितेश नितेश राणे यांनी देखील दुपारी आंदोलनस्थळी जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि सरकारवर जोरदार टीका केली.
Water Resources Minister Jayant Patil criticized BJP
या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. जयंत पाटील म्हणतात, एसटी महामंडळातील कर्मचारी हे आमचेच आहेत. आम्ही कोणताही दुजाभाव आजपर्यंत केलेला नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची आमची पूर्ण इच्छा आहे. आणि म्हणूनच आम्ही इथे आहोत. आमची पूर्ण सहानुभूती एसटी कर्मचारयांसोबत आहे. भाजपमधील काही नेते आंदोलनामध्ये पुढे येऊन बसतात, दंगा करतात, अर्वाच्च्य बोलतात हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
एनसीबी चा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी – जयंत पाटील
पुढे ते म्हणतात, आजपर्यंत सगळी सरकारी, निमसरकारी कर्मचार्यांची आंदोलने ही त्या त्या संघटना करायचे. कोणताही राजकीय पक्ष संघटनांमध्ये पुढे येऊन सहभाग घ्यायचा नाही. पण भाजपने मात्र या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या ना त्या कारणाने त्यांना सरकारविरोधात वातावरण निर्माण करायचे आहे. असे दिसते आहे. असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App