गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील गोराई परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सरकारी जागेवरील बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली गेली. आता या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य आणि आरामार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे. War Museum of Chhatrapati Shivaji Maharaj to be held in Mumbai
मुंबईत होणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे वॉर म्युझियम! मुंबईतील सरकारी जमिनींवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम सुरु केली आहे. आज गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. येणाऱ्या काळात त्या ठिकाणी… pic.twitter.com/gIytdTnwXk — Mangal Prabhat Lodha (Modi Ka Parivar) (@MPLodha) June 6, 2023
मुंबईत होणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे वॉर म्युझियम!
मुंबईतील सरकारी जमिनींवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम सुरु केली आहे. आज गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. येणाऱ्या काळात त्या ठिकाणी… pic.twitter.com/gIytdTnwXk
— Mangal Prabhat Lodha (Modi Ka Parivar) (@MPLodha) June 6, 2023
या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटद्वारे माहिती देताना सांगितले की, ‘’सरकारी जमिनींवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम सुरु केली आहे. आज गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. येणाऱ्या काळात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे, जेणेकरून पुढील पिढ्यांना छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल.’’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App