पालखी मार्गावरील महत्वाचे ठिकाण असलेल्या पंढरपूरजवळील वाखरी ग्रामस्थांनी पायी वारी सोहळ्याला विरोध केला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पालख्या एसटीतून आणाव्यात अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे. वाखरी गावात कोरोनाने ३० जणांचा मृत्यू झालेला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. Wakhri villagers opposes Pai Wari ceremony, bring Palkhi from ST, Letters written to the Chief Minister
प्रतिनिधी
सोलापूर: पालखी मार्गावरील महत्वाचे ठिकाण असलेल्या पंढरपूरजवळील वाखरी ग्रामस्थांनी पायी वारी सोहळ्याला विरोध केला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पालख्या एसटीतून आणाव्यात अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे. वाखरी गावात कोरोनाने ३० जणांचा मृत्यू झालेला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाखरी ग्रामपंचायतीच्यावतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालखी सोहळ्याची प्रमुख संस्थानं यांना पत्र लिहिण्यात आलं आहे आहे. वाखरी गावात सुमारे 800 कोरोनाबधित रुग्ण सापडले होते. 30 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 30 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या परिस्थितीत पायी आषाढी यात्रा सोहळा झाला तर वाखरी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला जाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलं आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीच्यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे शेवटच्या मुक्कामाचे ठिकाण आणि पालखी सोहळ्यातिल शेवटचे गोल रिंगण वाखरीमध्ये होते. वाखरी या गावात सर्वच संतांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम असतो. दोन वर्षांनी पालखी सोहळे आले तर इथे मोठी गर्दी होऊ शकते. पंचक्रोशीतील भाविक वाखरीत गर्दी करु शकतात,
त्यामुळं संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे वाखरी ग्रामपंचायतीने यंदाचा पालखी सोहळा गतवर्षी प्रमाणे प्रतिकात्मक पद्धतींनं स्वरूपात साजरा करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे लेखी पत्र आळंदी संस्थानला पाठवण्यात आले आहे, असं गावच्या सरपंच कविता पोरे यांनी सांगितलं आहे. जर का पायी वारीला परवानगी दिली तर वाखरी गाव बंद ठेवू असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय.
यंदाही गत वर्षीप्रमाणे एस टी बस मधून, मोजक्या वारकऱ्यांसह प्रातिनिधीक स्वरूपात पालखी सोहळा साजरा करावा. आम्ही एसटीतून आलेल्या पालखी सोहळ्याचं स्वागत करु, असेही वाखरी ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App