विशेष प्रतिनिधी
मुंबई : बिग बॉस मराठीच्या चावडीवर आज शेवटचे ग्रँड फिनाले होता. 17 स्पर्धकातून शेवटी 3 जण निवडले गेले होते. विशाल निकम, विकास पाटील आणि जय दुधाने हे तिघे फायनलिस्ट होते. ह्या तिघातून विकास पाटील साठी बिग बॉसने पुन्हा घरात जाण्याचा दरवाजा उघडला नाही. आणि विशाल आणि जय यांना टॉप टू मध्ये स्थान मिळाले. ह्या टॉप टू मधून विशाल निकम हा विजयी झाला आहे.
Vishal Nikam: Winner of Bigg Boss Season 3
कोण विजयी होणार? यासाठी सोशल मीडियावर पोल्स घेण्यात आले होते. विशालला 28 टक्के मते मिळण्याचा अंदाज होता तर जयला 25 टक्के मते मिळाली होती. जय आणि विशाल या दोघांनी शेवटच्या एपिसोड मध्ये डान्स परफॉर्मन्स देखील दिला होता.
Bigg Boss Marathi 3 : शिवलीला पाटील बिग बॉसच्या घरातून बाहेर , घरा बाहेर पडण्याचं नक्की काय आहे कारण?
बिग बॉसच्या घरात सर्वाधिक चांगले आणि फेअर गेम खेळणारा म्हणून विशाल ओळखला जायचा. तरूणाईत आणि सोशल मीडियावर विशालची, त्याच्या डान्सची जबरदस्त क्रेझ होती. मिथुन या सिनेमातुन त्याने मराठी चित्रपट सृष्टीत पदर्पण केले होते. धुमस ह्या चित्रपटात देखील तो झळकला होता. विशालला 20 लाखाचे बक्षीस आणि ट्रॉफी बक्षीस मिळाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App