Vinod Tawde : विनोद तावडेंचा राहुल गांधींवर पलटवार, एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक है!

Vinod Tawde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Vinod Tawde विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत अदानी आणि रॉबर्ट वॉड्रा यांचे फोटो दाखवत राहुल गांधी यांच्या आरोपांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एक है तो सेफ है आणि राहुल गांधी फेक है, अशी टीका देखील विनोद तावडे यांनी केली आहे.Vinod Tawde

एक हैं तो सेफ हैं राहुल गांधीके मन मे शेख हैं

धारावीची जमीन अदानीला देणार, असे राहुल गांधी म्हणतात. मात्र खरे असे आहे की ही जमीन महाराष्ट्र सरकारकडेच राहणार आणि ज्याने ते टेंडर घेतले त्याला ती जागा जाणार, असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे. या टेंडरमध्ये एक कंपनी अदानीची होती, एक कंपनी ही अबू धाबीमधली होती, त्यात ज्याला टेंडर मिळाले त्याला हे काम देण्यात येणार आहे. धारावीमध्ये जे लोक राहतात त्या सर्वांना घरे मिळणार, असेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. आता धारावीच्या जागेसाठी अबू धाबीच्या शेखची सुद्धा कंपनी होती, मात्र, त्यांना ते मिळाले नाही. मग आम्ही असे म्हणायचे का एक है तो सेफ है राहुल गांधीके मन मे शेख है, असे म्हणायचे का आम्ही? असा सवालही विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.



महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक सर्वात जास्त

राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गेले. एयर बसचा उल्लेख त्यांनी केला, त्यानंतर फॉक्सकॉन कंपनी कशी महाराष्ट्राबाहेर गेले हे त्यांनी सांगितले. मात्र महायुतीच्या काळात एकही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक सर्वात जास्त आहे, 2022-23 आणि 2023-24 या वर्षात 1.18 लाख कोटी आणि 1.25 लाख कोटी, 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 70 हजार 795 कोटींची गुंतवणूक ऑलरेडी आलेली आहे. ही जर आकडेवारी सांगायची झाली तर एकूण गुंतवणुकीच्या सरासरी 21 टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली आणि आता तिमाहीही 52 टक्के आली आहे. ही वस्तुस्थिती असताना राहुल गांधी महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्याचा फेक प्रयत्न करत असल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे.

शेखला धारावीची जमीन द्यायची आहे का?

ज्यावेळी अदानीला तुमच्याच काळात एवढ्या गोष्टी दिल्या, 1990 मध्ये मुंदरा, 2005 मध्ये फूड कार्पोरेशनचे अॅग्रीमेंट तुम्ही केले मनमोहन सिंह यांच्या काळात, एमडीओचे कॉंट्रॅक्ट तुम्ही त्यांना दिले, 2010 ला इंडोनेशिया आणि यांचे अॅग्रीमेंट तुम्ही करून दिले. हे वासताव आहे. इथे येऊन गरीब धारावीकरांना घर मिळणार नाही असे सांगून कुठल्या तरी शेखला धारावीची जमीन द्यायची आहे का? असा सवाल विनोद तावडे यांनी राहुल गांधी यांना विचारला आहे.

उद्धव ठाकरेंना केला सवाल

पुढे बोलताना विनोद तावडे म्हणाले, आज प्रचार संपत आहे, हा प्रचार संपत असताना माझ्या उद्धव ठाकरे यांना प्रश्न आहे, तुम्ही ज्या कॉंग्रेसच्या सोबत महाविकास आघाडी केली त्यांचे नेते माननीय बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायला तयार नाहीत. प्रियंका गांधी इथे आल्या, प्रियंकाजी जमात ए इस्लामी या संस्थेच्या अधिकृत सहकाऱ्याने निवडणूक लढवत आहेत, जी संस्था म्हणते की आम्हाला भारतात इस्लामिक शासन आणायचे आहे, उबाठाला हे मान्य आहे का? हा आमचा प्रश्न आहे.

मोदी यांनी 25 कोटी लोक गरीबी रेषेच्या वर आणले

विनोद तावडे म्हणाले, इंदिरा गांधींनी गरीबी हटावचा नारा दिला, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 कोटी लोक गरीबी रेषेच्या वर आणले. ही आकडेवारी महाविकास आघाडी मान्य करेल का? मोदी सरकारच्या काळातील इनफ्लेशन आणि युपीए काळातील इनफ्लेशनचा अभ्यास केला तर नेहमी युपीएचे हे जास्त राहिले आहे. जागतिक युद्ध सुरू असताना भारताने मोदींच्या नेतृत्वात इनफ्लेशन कसे रोखले हे सगळ्या जगाने मान्य केले आहे.

पुढे बोलताना विनोद तावडे म्हणाले, मोदी सरकारने केलेली विकासकामे आणि महायुती सरकारने केलेली कामे हे जनतेसमोर नेऊन महायुतीने मतदानाच्या दिवशी मतदारांनी बाहेर पडून आवर्जून मतदान करावे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला निवडून द्यावे, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले आहे.

Vinod Tawdecha hits back at Rahul Gandhi, If you are united then you are safe, Rahul Gandhi is fake!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात