विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Vijayatai Rahatkar आरक्षणामुळे महिलांचा राजकारणातील टक्का वाढतोय. परंतु, सध्या महिला पाच वर्षांची पाहुणी म्हणून येत आहे, हे चित्र आता बदलले पाहिजे, त्यांनी स्वत: काम करायला शिकले पाहिजे आणि कुटुंबातील पुरुषांनी त्यांना काम करू देण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. तेव्हाच महिलांच्या नेतृत्वातील भारत घडू शकतो. त्यासाठी केंद्रीय महिला आयोग काम करणार असल्याचे मत केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर ( Vijayatai Rahatkar ) यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.Vijayatai Rahatkar
एनआरए मॅरेजेसमधील प्रश्न, सायबर क्षेत्रातील महिलांची सुरक्षा आणि मॅट्रिमोनियल साइट्सवरील महिलांची फसवणूक या विषयांवर प्राधान्याने काम करणार असल्याचे रहाटकर म्हणाल्या. “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना एनआरए मॅरेजेसमधील अनेक तक्रारी येत होत्या. मात्र त्या दिल्ली कार्यालयाकडे पाठवण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नव्हतो. त्या वेळी महाराष्ट्राच्या पुढाकाराने दिल्लीत नॅशनल कॉन्फरन्स घेण्यात आली. तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्याचे नेतृत्व केले. त्यानंतर एनआरए मॅरेजेसचे बिल तयार झाले. सध्या हे बिल संसदीय समितीपुढे असून ते प्रत्यक्षात यावे यासाठी प्रयत्न करणार आहोत,’ असे त्या म्हणाल्या.
बूथ कार्यकर्ती ते केंद्रीय अध्यक्ष, हा पक्षाने दाखवलेला विश्वास
१९९५ मध्ये छत्रपती संभाजीनगरात भाजपची बूथ कार्यकर्त्या म्हणून रहाटकर यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर महापौर, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राजस्थान, आसामच्या प्रभारी अशा अनेक पदांवर त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. यात संयम आणि सातत्य हे गुण मदतीस आल्याचे त्यांनी नमूद केले.
आज आरक्षणामुळे महिला राजकारणात येतात, परंतु पाच वर्षांच्या पाहुण्या ठरतात. हे चित्र बदलले पाहिजे. त्यांनी कामे शिकून घेतली पाहिजेत, त्यांच्या कुटुंबीयांनी तिच्या वतीने ती कामे स्वत: करण्याची मानसिकता बदलली पाहिजे. प्राचीन भारताचा इतिहास मातृसत्ताक आहे. अनेक राजकर्त्या महिलांनी आपल्या समाजाची पायाभरणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय महिला आयोगही महिलांना माहेर वाटले पाहिजे
कोणतीही अडचण आल्यास महिला हक्काने माहेरी धाव घेतात. महिला आयोगही महिलांना माहेर वाटले पाहिजे. तेवढ्या विश्वासाने त्या आयोगाकडे आल्या पाहिजेत आणि आयोगाने त्यांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा देशभर उभी करणार असल्याचे रहाटकर यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App