विशेष प्रतिनिधी
नाशिक : गोदातटीच्या माहेरवाशीणीचा गौरव करण्याची अप्रतिम संधी लवकरच नाशिककरांना मिळणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांचा नाशिकमध्ये गुरुवारी भव्य सत्कार सोहळा आयोजित केला आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केलेल्या या भव्य कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विजयाताईंचा सत्कार होणार आहे.
विजयाताई किशोर रहाटकर या मूळच्या विजयाताई खोचे. नाशिक मध्येच त्यांचे माहेर. नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. संघ परिवारातून त्यांनी विविध सेवा कार्यांसाठी पुढाकार घेतला. विवाहानंतर त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये राहायला गेल्या. तिथे त्यांनी संभाजीनगरचे महापौर पद भूषविले. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या त्या अध्यक्षा बनल्या आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाताईंवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. त्यांचे नाशिककरांशी ऋणानुबंध कायम आहेत.
नाशिकची ही माहेरवाशीण स्वकर्तृत्वाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचल्याचा समस्त नाशिककरांना अभिमान आणि कौतुक वाटते. त्यामुळेच रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने पुढाकार घेऊन विजयाताईंचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला आहे. नाशिकच्या बीवायके महाविद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहात येत्या गुरुवारी 6 फेब्रुवारी 2025 येत्या गुरुवारी सायंकाळी 6.00 वाजता हा भव्य कार्यक्रम होणार आहे. समस्त नाशिककरांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App