अतिवृष्टीने राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर व सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच थेट खात्यात मदत मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. Vijay Wadettiwar said Heavy Rainfall compensation amount will transfer to farmers account before Diwali
विशेष प्रतिनिधी
नागपूर : अतिवृष्टीने राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर व सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच थेट खात्यात मदत मिळणार असल्याचे जाहीर केले आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यादृष्टीने प्रयत्न केले आहेत. वित्त आयोगाकडून आज मदत व पुनर्वसन खात्याकडे निधी वर्ग करण्यात येणार आहे. दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात गेला पाहिजे. हा निधी रब्बी हंगामाच्या उपयोगी पडावा, खरीप तर गेला आहे. किमान रब्बी हंगामासाठी हा निधी वापरला जावा, असंही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील सुमारे 55 लाख हेक्टर शेती क्षेत्राचं नुकसान झाल्याची माहिती सर्वेक्षणातून आली आहे. सर्वाधिक 70 टक्के नुकसान मराठवाड्यात झालेलं आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर जिल्ह्यातही नुकसान झालं आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं आणि तेथे सर्वाधिक मदत देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 3700 कोटी रुपयांचा निधी वाटला जाईल, अकोला, अमरावती आणि वाशिम भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी निधी दिला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्राच्या मदतीवर ते म्हणाले की, एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे केंद्र सरकारकडून अद्याप निधी आलेला नाही. मात्र, तो निधी येईल, अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App