विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vijay wadettiwar विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचे महाविकास आघाडीचे घोडे अद्याप अडलेच, पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मात्र महायुतीत “डोकवायला” पुढे सरसावले. Vijay wadettiwar pip in mahayuti
महाविकास आघाडीत मोठा भाऊ मधला – भाऊ – छोटा भाऊ हा वाद अजूनही कायम आहे आघाडीच्या वरिष्ठ आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या किमान तीन-चार बैठका झाल्या, पण मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा वाद अद्याप सुटलेला नाही. विशेषतः मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस आणि पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातले वाद कायम आहेत. लोकसभा निवडणुकीतल्या परफॉर्मन्सच्या आधारे काँग्रेस जागा वाटपात “दादागिरी” करते आहे.
Adani-Group : अदानी-ग्रुपची धारावी प्रकल्पात ₹2,000 कोटींची गुंतवणूक; 2 महिन्यांत बांधकाम सुरू होणे अपेक्षित
त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. फक्त रोज वेगवेगळे फॉर्मुले माध्यमांमध्ये पेरण्याचे काम मात्र महाविकास आघाडीचे नेते करतात. त्या पलीकडे आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटपातली “प्रगती” गाठलेली दिसत नाही.
पण महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे घोडे असे अर्ध्या वाटेतच अडले असताना काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार मात्र महायुतीत “डोकावले”. महायुतीमध्ये अजित पवारांना स्थान नाही. अजित पवारांवरून भाजप आणि शिवसेनेतल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या अंतिम क्षणी अजितदादांच्या राष्ट्रवादीची बोळवण फक्त 40 जागांवर करतील, नाहीतर त्यांना बाहेर जायला सांगतील, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. Vijay wadettiwar
महाविकास आघाडीत मात्र जागा वाटपात मतभेद नाहीत. आम्ही मैत्रीपूर्ण चर्चा करून शांततेत जागावाटप पूर्ण करू, एवढे बोलून वडेट्टीवार यांनी आघाडीतल्या जागावाटपाचे घोडे का अडले??, या सवालाचे सविस्तर उत्तर देणे टाळले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App