विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतातील बँकांचे कर्ज बुडवून विदेशात फरार झालेला व्यावसायिक विजय मल्ल्याचे किंगफिशर हाऊस विकण्यात आले आहे. हैदराबादस्थित प्रायव्हेट डेव्हलपर्स सॅटर्न रियल्टर्सने ते 52 कोटी रुपयांना खरेदी केले. किंगफिशर हाऊस कर्जवसुली न्यायाधिकरणाने (डीआरटी) विकले होते. विक्री किंमत त्याच्या 135 कोटी रुपयांच्या राखीव किंमतीच्या एक तृतीयांश आहे.Vijay Mallya Kingfisher House sold for Rs 52 crore, property auction failed 8 times Before
ही मालमत्ता किंगफिशर एअरलाइन्सचे मुख्य कार्यालय आहे. मल्ल्याची विमान कंपनी आता बंद झाली आहे. एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कंपनीकडे सुमारे 10 हजार कोटी रुपये देणे आहे. मालमत्तेचे क्षेत्रफळ 1,586 चौरस मीटर आहे, तर भूखंड 2,402 चौरस मीटर आहे. कार्यालयाच्या इमारतीत तळघर, तळमजला, वरचा तळमजला आणि वरचा मजला आहे.
याआधी, किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज दिलेल्या 10,000 कोटींपैकी 7,250 कोटी रुपये विजय मल्ल्याचे शेअर्स विकून वसूल केले होते. 23 जून 2021 रोजी झालेल्या या लिलावात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांनी युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि मॅकडोनाल्ड होल्डिंग्ज लिमिटेडमध्ये मल्ल्याचे शेअर्स विकले. यामध्ये रिकव्हरी ऑफिसरने 4.13 कोटी युनायटेड ब्रेवरीज, 25.02 लाख युनायटेड स्पिरिट्स आणि 22 लाख मॅकडोनाल्ड्स होल्डिंग्ज ब्लॉक डीलमध्ये विकले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, किंगफिशर हाऊस विकण्याच्या अनेक प्रयत्नांनंतरही कर्ज देणाऱ्या बँकांना खरेदीदार न सापडल्याने लिलाव होऊ शकला नव्हता. यापूर्वी मालमत्तेचा लिलाव 8 वेळा अपयशी ठरला होता. किंगफिशर हाऊसचा मार्च 2016 मध्ये पहिल्यांदा लिलाव झाला. यामध्ये मालमत्तेची किंमत 150 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आली होती, परंतु लिलाव अयशस्वी झाला.
किंगफिशर हाऊसचे स्थान विलेपार्ले, मुंबई विमानतळाजवळ आहे. रिअल्टी तज्ज्ञांच्या मते, ही मालमत्ता सध्या मुंबई विमानतळाच्या बाहेरील भागात असल्याने ती विकसित करण्यास वाव नाही. विजय मल्ल्याची विमान कंपनी किंगफिशर एअरलाइन्स 2012 पासून बंद आहे. मल्ल्याला विलफुल डिफॉल्टर घोषित करण्यात आले आहे.
26 जुलै रोजी यूके कोर्टाने विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषित केले. या आदेशामुळे भारतीय बँका आता मल्ल्याची जगभरातील मालमत्ता सहज जप्त करू शकतील. भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील भारतीय बँकांच्या संघाने मल्ल्याविरोधात ब्रिटिश न्यायालयात याचिका दाखल केली. मल्ल्याला लंडन उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याची संधी नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App