अवधुत गुप्तेंनी सांगितलं त्यांना नेमकं काय खुपतं? पाहा घटनेचा व्हिडीओ
विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांच्या घरात सध्या मागील काही दिवसांपासून दररोज माकडं येत आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय वैतागले आहेत. या प्रकाराचा व्हिडीओही अवधुत गुप्ते यांनी स्वत: शेअर केला आहे आणि त्यांना काय नेमकं काय खुपतंय हे सांगितलं आहे. अवधुत गुप्ते ट्वीटरवरील पोस्टद्वारे म्हणतात, ‘’अहो गुप्ते .. तुम्हाला काय खुपते? तर सध्या आम्हाला दररोज सकाळी उठून बघायला मिळणारी एक “माकड चेष्टा” खुपते!!’’ Video When the monkey entered Avadhut Guptes house it ran over his mother
तर आपल्या पोस्टसोबत घरात माकड शिरल्यानंतरचा व्हिडीओ शेअर करत अवधुत गुप्तेंनी सांगितलं आहे की, ‘’व्हिडिओमध्ये दिसणारी ही माझी आई. हीचंच आम्ही दोन वर्षांपूर्वी लंग ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलंय. तर, तिच्या नाकावर टिच्चून घरात येऊन केळी पळवणारा (पळवणारा कुठला.. तिथेच बसून खाणारा!) आणि तिच्याच अंगावर धावून जाणारा हा हुप्प्या बघा! हा त्रास आमच्या बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगर मधल्या प्रत्येक रहिवाशाला आता असह्य झाला आहे! अनेकांनी वनखात्याकडे तक्रार देखील केली आहे. वनखाते देखील काही उपाययोजनांचा विचार नक्कीच करत असेल, ह्याची मला खात्री आहे. ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान‘ हे बाजूलाच असल्यामुळे, विविध पक्षी- प्राण्यांच्या भेटी हे खरंतर आमच्या श्रीकृष्णनगरचे आभूषण. आम्ही हे वर्षानुवर्षांपासून मिरवत देखील आलो आहोत. पण, माकडांचा त्रास हा कोरोना पश्चात कित्येक पटींनी वाढला आहे, हे मात्र खरं! .. आणि ह्याचं खरं कारण म्हणजे “त्याआधी वर्षानुवर्षे उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी ह्याच माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज्!”
याचबरोबर ‘’ही माकडं पिढ्यानपिढ्यापासून आता ‘शंभर टक्केच्या वन्य जीवनाला‘ मुकली आहेत. झाडावर राहतात, तरी टाकीवरच्या पत्र्याखाली झोपतात. आमच्याच झाडावरच्या तुत्या, जाम, आंबे, पेरू वगैरे फळे काढून खातात सुद्धा. पण, ते केवळ हौसे खातर! बाकी.. सकाळी घरांच्या खिडक्यातून चपात्या लाटण्याचे आवाज आणि फोडण्यांचा वास सुटला, की खिडकीच्या जाळ्यांवर येऊन ओरडा आरडा करून हक्काने हे सर्व पदार्थ मागतात.’’ असंही अवधुत गुप्तेंनी सांगितलं.
https://youtu.be/yF37NyzHVH4
अहो गुप्ते .. तुम्हाला काय खुपते?तर सध्या आम्हाला दररोज सकाळी उठून बघायला मिळणारी एक "माकड चेष्टा" खुपते!!😂 व्हिडिओमध्ये दिसणारी ही माझी आई. हीचंच आम्ही दोन वर्षांपूर्वी लंग ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलंय. तर, तिच्या नाकावर टिच्चून घरात येऊन केळी पळवणारा (पळवणारा कुठला.. तिथेच… pic.twitter.com/AIc8A7MyIE — Avadhoot Gupte (@AvadhootGupte) July 25, 2023
अहो गुप्ते .. तुम्हाला काय खुपते?तर सध्या आम्हाला दररोज सकाळी उठून बघायला मिळणारी एक "माकड चेष्टा" खुपते!!😂
व्हिडिओमध्ये दिसणारी ही माझी आई. हीचंच आम्ही दोन वर्षांपूर्वी लंग ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलंय. तर, तिच्या नाकावर टिच्चून घरात येऊन केळी पळवणारा (पळवणारा कुठला.. तिथेच… pic.twitter.com/AIc8A7MyIE
— Avadhoot Gupte (@AvadhootGupte) July 25, 2023
याशिवाय, ‘’माकडं यायची. कोरोना आधी सुद्धा यायची. पण, महिन्या-दोन महिन्यातून चुकून भरकटत आलेली अशी. करोना काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना जायची परवानगी बंद झाली आणि त्याबरोबरच बंद झाला ह्या माकडांचा खुराक. मग ह्या वेळेस तो खुराक शोधत ती इथे आली आणि मग इथलीच झाली. आता ती इथेच राहतात आणि छळतात! बाकी स्ट्रगल चालूच राहील..फक्त ह्यापुढे तुम्ही कुठेही फिरायला गेलात आणि माकड दिसल्यावर त्यांना काही बाही खाऊ द्यायला तुमचा हात किंवा मुलं पुढे सरसावलीच.. तर हा व्हिडिओ नक्की आठवा! एवढेच काय ते.. शुभ दिवस!’’ अशा शब्दांमध्ये अवधुत गुप्तेंनी आपली व्यथा मांडील आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App