नुसते I.N.D.I.A नाव ठेवून भागत नाही, हिजबुल, पीएफआयच्या नावातही इंडियन; मोदींचे विरोधी आघाडीवर टीकास्त्र


प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेल्या 26 पक्षाने आपल्या आघाडीचे नाव I.N.D.I.A ठेवले. या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. नुसते I.N.D.I.A नाव ठेवून भागत नाही. कारण हिजबूल मुजाहिदीन, पीएफआय या दहशतवादी संघटनाच्या नावातही इंडियनच आहे. पण त्यांच्या कारवाया काय आहेत, हे सगळे जग जाणते, असे शब्दात मोदींनी विरोधकांच्या I.N.D.I.A आघाडीचे वाभाडे काढले BJP MP quotes PMs sharp attack on Congress INDIA

विरोधकांच्या आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) आदी 26 विरोधी पक्ष सामील झाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विरोधकांच्या आघाडीवर टीका केली आहे. यावेळी टीका करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केवळ इंडिया हे नाव ठेवल्याने काही होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीमध्येही इंडिया होते आणि इंडियन मुजाहिद्दिन आणि पीएफआयच्या नावातही “इंडिया” आहे. त्यांच्या कारवाया सगळ्या जगाला माहिती आहेत.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर प्रकरणावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधक विखुरलेले आणि हतबल झाले आहेत. त्यांना फार काळ सत्तेवर येण्याची इच्छा नाही, असे विरोधकांच्या वृत्तीवरून दिसत आहे. पावसाळी अधिवेशनात भाजप एनडीए संसदीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती.

या बैठकीत मोदींनी I.N.D.I.A आघाडीवर शरसंधान साधल्याने सत्ताधारी आघाडीतल्या खासदारांचा हुरूप वाढला आहे.

BJP MP quotes PMs sharp attack on Congress INDIA

 

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात