
गेली दोन वर्षे त्या मंगळुरू येथील कन्या साक्षी अभिजित शिवलकर यांच्याकडे राहायला गेल्या होत्या. तेथेच त्यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.Veteran writer Smita Sharad Rajwade dies of heart attack at 73 years
विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : रत्नागिरी येथील ज्येष्ठ लेखिका स्मिता शरद राजवाडे यांचे मंगळवारी रात्री मंगळुरू येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. स्मिता या ७३ वर्षांच्या होत्या.त्यांना स्वाती, साक्षी आणि गौरी अशा तीन विवाहित कन्या आहेत. गेली दोन वर्षे त्या मंगळुरू येथील कन्या साक्षी अभिजित शिवलकर यांच्याकडे राहायला गेल्या होत्या. तेथेच त्यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
बालपण आणि शिक्षण
ज्येष्ठ लेखिका स्मिता राजवाडे यांचा जन्म ३० जानेवारी १९४८ रोजी झाला.स्मिता यांनी हिंदी आणि मराठी या दोन विषयांत प्रथम श्रेणीतून एम. ए. पदवी संपादन केली. राष्ट्रभाषा पंडित, साहित्य विशारद या परीक्षाही त्या ‘प्रथम’ श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.
भाषेवरील प्रेम
हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील साहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग होता.त्या उर्दू भाषाही शिकल्या. त्यातून त्यांनी उर्दू साहित्याचा अभ्यास केला.त्यांनी काही उर्दू काव्यरचनाही केल्या होत्या. तसेच स्वा. सावरकर, कुसुमाग्रज, संत कबीर यांच्यावर त्यांनी विपुल लेखन केले. रामचरितमानस या संपूर्ण काव्याचा त्यांनी मराठीत अनुवादही केला.
१७ पुस्तके प्रसिद्ध
कादंबरी, कथा, ललित, काव्यसंग्रह, अनुवादित कवितासंग्रह, बालसाहित्य, नाटक अशी त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. गुण गुण गाणी या त्यांच्या बालसाहित्य संग्रहाला पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा पुरस्कार मिळाला. शीघ्रकाव्य हेही त्यांच्या साहित्यप्रतिभेचे वैशिष्ट्य होते.कोकण मराठी कोषामध्ये त्यांनी लेखन केले आहे.ज्यात स्त्रीजीवन, संतसाहित्यावरील लेखनाचा त्यात समावेश आहे.
‘ए’ ग्रेड कलाकार म्हणून मान्यता
आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कवयित्री होत्या. त्यांना ‘ए’ ग्रेड कलाकार म्हणून मान्यता मिळाली होती. रत्नागिरीत आकाशवाणीचे केंद्र सुरू झाल्यानंतर त्यांनी विविध कार्यक्रम केंद्रावर सादर केले.त्यांनी रत्नागिरीत पटवर्धन हायस्कूल आणि फाटक प्रशालेत काही काळ अध्यापन केले. रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील जनसेवा ग्रंथालयासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले.
Veteran writer Smita Sharad Rajwade dies of heart attack at 73 years
महत्त्वाच्या बातम्या
- BJP Candidates List: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ३४ उमेदवारांची यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला कुठून मिळाले तिकीट!
- OBC Reservation : NEET-PG मध्ये OBC आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा आज मोठा निर्णय, वाचा सविस्तर…
- नगरपंचायत निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर घसरलेल्या शिवसेनेचे सुरू आहे “सोंगाड्या”, “चिवा”, “चंपा”!!
- उत्पल पर्रीकर यांना भाजपने तिकीट नाकारले केजरीवालांचे पर्रीकरांना ‘आप’ मध्ये येण्याचे आवाहन