प्रतिनिधी
मुंबई : आफ्रिकेतील किलिमंजारो हे सर्वोच्च शिखर सर करून एका मराठी जवानाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनोखी मानवंदना दिली आहे.मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागातील महत्त्वाच्या पदावर प्रणित शेळके सध्या कार्यरत असून त्याला गिर्यारोहणाची प्रचंड आवड आहे. शुक्रवारी २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने प्रणित शेळके या गिर्यारोहकाने वीर सावरकरांना अनोखे अभिवादन केले.Veer Savarkar greeted by Marathi soldiers by climbing Kilimanjaro peak in Africa !
वीर सावरकर आयएएस स्टडी सर्कलचा विद्यार्थी प्रणित शेळके याने बुधवारी, १६ फेब्रुवारी रोजी मुंबईहून अफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याचे ठरवले आणि स्वा. सावरकर आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने २६ फेब्रुवारी रोजी किलिमंजारो हे अफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर त्याने सर केले आणि स्वा. सावरकर निर्मित ध्वज फडकविला.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ गिर्यारोहक आनंद शिंदे यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली प्रणितने किलिमंजारो या अत्त्युच्च हिमशिखरावरील चढाई केली. महाराष्ट्र पोलीस दलातील पहिले एव्हरेस्टवीर शेख रफिक यांनाही प्रणितने या कामगिरीचे श्रेय दिले आहे. प्रणित हा वीर सावरकरांचा कट्टर अनुयायी असून त्याला गड-किल्ले, ऐतिहासिक वैभवावर भ्रमंती करण्यास आवडते. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रणितने हिमालयातील ३ मोठी शिखरे सर केली आहेत.
कोण आहेत प्रणित शेळके??
मुंबई अग्निशमन दलाचा प्रणित शेळके पहिला प्रशिक्षित असून जो गिर्यारोहक आहे. बालमोहन’चा माजी विद्यार्थी आणि उच्चशिक्षित असलेल्या प्रणितला त्याच्या या दलाचा खुप अभिमान असून अत्यंत तुटपुंज्या कालावधीत गिर्यारोहणाद्वारे मिळवलेल्या यशाचे संपूर्ण श्रेय तो मुंबई अग्निशमन दलास देतो. #ड्रिम_ॲडव्हेंचर… या संस्थेने प्रणितला किलिमंजारो मोहिमेकरीता मोलाचे साह्य केले. यासह प्रत्येक गिर्यारोहण साहसाकरीता कायमच पाठिशी असल्याचे सांगितले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App