प्रतिनिधी
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबईत तक न्यूज चॅनलला मुलाखत दिली. त्यानंतर नाशिक मध्ये येवला दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. या दोन्ही ठिकाणी पवारांनी स्वतःची तुलना माजी पंतप्रधान मोरारजी देसाई आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी केली.Vajpayee’s words, Pawar neither tired nor retired; But Nashik reporters later added FIRE!!
मुंबई तक न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अगदी शेवटी पत्रकार साहिल जोशी यांनी अजित पवारांनी शरद पवारांना दिलेल्या सल्ल्याविषयी प्रश्न विचारला. शरद पवारांनी आता वयाच्या 83 व्या वर्षी रिटायर्ड व्हावे, असा सल्ला अजित पवारांनी दिला होता. त्याबाबत उत्तर देताना पवारांनी सुरुवातीला साधेच उत्तर दिले. इतर कोणी सांगतात म्हणून मी का रिटायर्ड व्हावे?? माजी पंतप्रधान मोरारजी देसाई वयाच्या 84 व्या वर्षी पंतप्रधान बनले होते. मी काय त्यांच्यासारखा पंतप्रधान बनायला निघालो आहे का?? अटल बिहारी वाजपेयी देखील बरीच वर्षे ऍक्टिव्ह होते, असे शरद पवार म्हणाले. त्यावर साहिल जोशीने वाजपेयींचे ना टायर्ड, ना रिटायर्ड हे वाक्य पवारांना ऐकवले. ते वाक्य पवारांनी नंतर उच्चारले. त्यामुळे मुंबई तकच्या मुलाखतीची बातमी पवारांनी ना टायर्ड, ना रिटायर्ड, असे उच्चारल्याची झाली.
नाशिकच्या पत्रकारांनी जोडले फायर
त्यानंतर नाशिकच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना पत्रकारांनी अजित पवारांच्या सल्ल्याचा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना देखील पवारांनी परत एकदा वाजपेयी आणि मोरारजी देसाई यांचीच उदाहरणे दिली. त्यावेळी पवारांनी साहिल जोशीने आठवण करून दिलेल्या ना टायर्ड, ना रिटायर्ड या वाजपेयींच्या वाक्याचा पुनरूच्चचार केला.
पण त्यावर नाशिकच्या पत्रकारांनी मात्र तुम्ही त्याला फायर जोडणार का??, असा सवाल केला आणि त्यातला फायर हा शब्द पत्रकारांनीच पवारांच्या तोंडी घालून बातमीला जोडून टाकला. वास्तविक पवारांच्या मूळ उच्चारांमध्ये फायर शब्दच नव्हता. तो प्रश्न पत्रकारांनी विचारला आणि फायर शब्द पवारांच्या वक्तव्याला जोडला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App