शेवगाव दंगलीत विशिष्ट समूदायाकडून अल्पवयीन मुलांचा वापर; सुजय विखे पाटलांचे परखड वक्तव्य

प्रतिनिधी

नगर : शेवगावमध्ये १४ मे रोजी मध्यरात्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत दोन गटात जोरदार दगडफेक झाली. यावेळी जाळपोळ देखील करण्यात आली.Use of minors by certain communities in Shevgaon riots

दोन गटातील वादाचे रुपांतर दंगलीत झाल्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अनेक दुकानांचे नुकसान झाले. दगडफेकीत ३ पोलीस, गृहरक्षक दलाचे ४ जवान जखमी झाले. तसेच इतर नागरिकही जखमी झाले. या दंगलीवरून सध्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.

शेवगावात झालेल्या दंगलीविषयी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी एक वक्तव्य केले आहे. विशिष्ट लोकांकडून दंगलीत अल्पवयीन मुलांचा वापर केला जातोय, असे वक्तव्य खासदार सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले.

शेवगाव मधील दंगली संदर्भात आम्ही न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार करतोय. काही विशिष्ट लोकांनी दंगली सारखे गुन्हे करण्यासाठी नवी पद्धत सुरू केली आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले वापरली जात आहेत.

जेणेकरून कायदा त्या विषयावर लवचिक आहे. म्हणून ही लवचिकता काढण्यासाठी वय हे महत्त्वाचे नाही, गुन्हा कोणता आहे. त्याला महत्त्व द्यावे, वयाला नाही, अशा पद्धतीची याचिका येत्या महिन्याभरात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहोत’, असे सुजय विखे पाटील म्हणाले.

Use of minors by certain communities in Shevgaon riots

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात