विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कन्या महाराष्ट्राच्या माजी मंत्री पंकजा मुंडे या ऊसतोड कामगार समवेत दिवसभर राहत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वापर भाजपला डिवचण्यासाठी सुरू केला आहे. Use of Gopinath Munde’s name by Sanjay Raut – Chhagan Bhujbal to oust BJP !!
भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा एकही नेता आज नाही. ते हयात असते तर शिवसेना भाजपची युती टिकून राहिली असती, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी करून भाजपच्या विद्यमान नेतृत्वाला डिवचले आहे.
तर केंद्र सरकारवर दबाव आणून गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले असते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. संजय राऊत आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वापर करून भाजपच्या विद्यमान नेतृत्वाला डिवचून घेतले आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमध्ये बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात केली. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. ते आज असते तर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची युती तुटली नसती. हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेमध्ये दिसले असते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
भाजप सध्या कायदेशीर मार्गाने ओबीसींच्या आरक्षणाचा अडवणुकीचे मार्ग अवलंबतो आहे. गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनी हे घडू दिले नसते. त्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले असते, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. राऊत आणि भुजबळ या दोन्ही नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वापर करून केवळ भाजपच्या विद्यमान नेत्यांना डिवचून घेतले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App