राज्य कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने रविवारी या योजनेला मंजुरी दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारने युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) UPS जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन स्कीम देण्याची घोषणा केली आहे. राज्यात यूपीएसला मान्यता देणारे केंद्रानंतर महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. राज्य कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने रविवारी या योजनेला मंजुरी दिली आहे.
मोदी मंत्रिमंडळाने रविवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) जाहीर केली होती, ज्या अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन देण्याची तरतूद होती. केंद्राची ही तरतूद लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ही योजना आपल्या राज्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
The Focus Explainer : द फोकस एक्सप्लेनर : UPS, NPS आणि OPS मध्ये काय आहे फरक? कोणते फायदे मिळतात? वाचा सविस्तर
रविवारी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने युनिफाइड पेन्शन स्कीमला (यूपीएस) मंजुरी दिली आहे. ही योजना राज्य सरकारांसाठीही लागू करण्याचा पर्याय केंद्र सरकारने दिला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने तत्परता दाखवत आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना UPS अंतर्गत पेन्शन देण्यास सर्वप्रथम मान्यता दिली आहे.
युनिफाइड पेन्शन UPS योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन आणि कौटुंबिक पेन्शनची हमी देण्याची तरतूद आहे. 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना लागू केली आहे. याशिवाय महागाई भत्ता वाढल्यास या योजनेअंतर्गत पेन्शनमध्ये वाढ करण्याचीही तरतूद आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App