वृत्तसंस्था
रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा उत्पादक हैराण झाले आहेत . रत्नागिरी जिल्ह्यात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दोन दिवस अवकाळी पाऊस पडल्यामुळे रत्नागिरी आणि लांजा तालुक्यांतील आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. आंबा काढणीला आला आहे. तर काही बागांमध्य झाडांना मोहोर आला आहे. अशा वेळी अवकाळी पाऊस झाल्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. अनेक बागांमध्ये आंबा गळून गेला अथवा खराब झाला. Unseasonal rains in kokan,Mango crop damage in Ratnagiri district
हापूस आंब्याची काढणी अनेक ठिकाणी सुरूवात झाली आहे. पावसामुळे काम दोन दिवस पुढे ढकलावे लागले. बदललेल्या वातावरणामुळे आंबा पिकावर कीडरोग पसरण्याचा धोका आहे. याआधीही एकदा कीड रोगाचा फटका बसला आहे. कीड रोगामुळे औषध फवारणीचा खर्च वाढला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App