मुख्यमंत्र्यांना वाढदिवशी अनोखी भेट; अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर वर जरांगे पाटलांसह व्हिडिओ झळकला थेट!!

युवा सेना सचिव राहुल कनाल यांच्या हटके शुभेच्छा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राज्यासह देशभरातील विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना आता थेट सातासमुद्रापार अमेरिकेतही मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन झाल्याचं पाहायला मिळाले. युवासेना पदाधिकारी राहुल कनाल यांनी टाइम्स स्क्वेअरवर व्हिडिओ झळकावत मुख्यमंत्री शिंदे यांना वाढदिवसानिमित्त ‘सरप्राइज गिफ्ट’ दिले.unique gift to the Chief Minister on his birthday; Live video with Jarange Patal on Times Square in America!!



राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस थेट अमेरिकेतील सुप्रसिद्ध चौकात साजरा करण्यात आल्याने या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरमध्ये मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या व्हिडिओमधून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विजयी क्षणाचा फोटोही झळकला आहे. तसेच या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, युवासेना पदाधिकारी राहुल कनाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी आणि मराठा आंदोलनावेळी सरकार आणि आंदोलक यांच्यात संवाददूताची भूमिका बजावणाऱ्या मंगेश चिवटे यांचाही फोटो झळकला आहे.

unique gift to the Chief Minister on his birthday; Live video with Jarange Patal on Times Square in America!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात