प्रतिनिधी
नागपूर : Union Minister Gadkari केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी ठामपणे सांगितले, “जो जातीची भाषा करेल, त्याला लाथ मारीन!”Union Minister Gadkari
ते पुढे म्हणाले, “मी धर्म आणि जातीबद्दल सार्वजनिक ठिकाणी बोलत नाही. माझ्यासाठी समाजसेवा महत्त्वाची आहे. मी निवडणूक हरलो किंवा मंत्रिपद गेलं तरीही माझं मत बदलणार नाही. जर मला मंत्रीपद मिळालं नाही, तर मी मरणार नाही.”
गडकरी यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही कधीही जात आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. राजकारणात वेगवेगळ्या गोष्टी घडतात, पण मी माझ्या तत्त्वांवर ठाम आहे. मला कोण मतदान करेल याची चिंता नाही. काही मित्रांनी सांगितलं की, सार्वजनिक जीवनात असताना अशा गोष्टी बोलू नयेत, पण मी माझ्या विचारांवर ठाम राहणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “जर एखादा मुस्लिम आयपीएस किंवा आयएएस अधिकारी झाला, तर संपूर्ण समाजाचा विकास होईल.”
गडकरींनी एक उदाहरण दिलं की, “जेव्हा मी आमदार होतो, तेव्हा एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची परवानगी अंजुमन-ए-इस्लाम संस्थेला हस्तांतरित केली होती, कारण मुस्लिम समाजाला त्याची अधिक गरज होती. जर मुस्लिम समाजातून अधिक अभियंते, आयपीएस आणि आयएएस अधिकारी निर्माण झाले, तर संपूर्ण देशाचा विकास होईल.”
शिक्षणाने जीवन बदलते
गडकरी यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “आज हजारो विद्यार्थी अंजुमन-ए-इस्लाम संस्थेमध्ये शिकून अभियंते झाले आहेत. जर त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नसती, तर ते काहीच करू शकले नसते. शिक्षण हीच खरी ताकद आहे, जी कोणाचंही जीवन आणि संपूर्ण समाज बदलू शकते!”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App