शिंदे – फडणवीसांना दिल्ली पुढे झुकल्याचे हिणवणारे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या जागावाटप चर्चेसाठी येणार दिल्लीलाच!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्ली पुढे झुकणारे नेते म्हणून हिणवणारे उद्धव ठाकरे स्वतः मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी दिल्लीलाच येणार आहेत. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा मुंबईत नव्हे, तर दिल्लीलाच होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंची दिल्लीवारी होणार असल्याचे निश्चित झाले. Uddhav Thackeray will come to Delhi to discuss seat allocation of Mahavikas Aghadi

हे तेच उद्धव ठाकरे आहेत, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्ली पुढे झुकणारे नेते म्हणून सतत हिणवत असतात. शिंदे – फडणवीस आणि अजितदादा महाराष्ट्रातले वेगवेगळे विषय घेऊन दिल्लीला येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अन्य मंत्र्यांना भेटतात. मात्र त्यावरूनच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची दिल्ली पुढे झुकणारे नेते म्हणून खिल्ली उडवत असतात.



पण स्वतः उद्धव ठाकरे कालच “इंडी” आघाडीच्या बैठकीत सामील होण्यासाठी दोन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. त्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी देखील ते दिल्लीलाच येणार आहेत. महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांच्यातली लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा मुंबईत होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ही चर्चा दिल्लीतच होणार आहे.

काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची स्वतंत्र समिती नेमली आहे, तसेच “इंडी” आघाडीच्या घटक पक्षांची चर्चा करण्यासाठी केंद्रीय पातळीवर स्वतंत्र समिती नेमली आहे. राजस्थानचे पराभूत झालेले मुख्यमंत्री अशोक गेहलोत या समितीचे प्रमुख आहेत. या समितीबरोबर चर्चा करण्यासाठी तसेच शरद पवारांबरोबर वाटाघाटी करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला येणार आहेत. ही माहिती स्वतः संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पुढची दिल्ली वारी “कन्फर्म झाली”. पण त्यामुळेच दिल्ली पुढे नेमके कोण झुकले??, याची चर्चा सुरू झाली आहे.

Uddhav Thackeray will come to Delhi to discuss seat allocation of Mahavikas Aghadi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात