प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेत मोठे बंड झाले. 40 आमदार निघून गेले. सत्ता गेली तरी देखील उद्धव ठाकरेंचा भाजप वरचा संताप अजूनही कायम असून बंडखोर आमदारांना परत मातोश्रीवर येण्याचे आवाहन करतानाच त्यांनी मूळात मातोश्रीचा अपमान करणाऱ्यांबरोबर का गेलात?, असा सवाल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे मी कायदे तज्ञांची बोलून आपल्याला सांगतो आहे, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेण्याची मागणी केली. Uddhav Thackeray targets BJP and defectors again
सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या दोन केसेस पेंडिंग आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना धनुष्यबाण हे चिन्ह गमावण्याचा धोका आहे. अशा बातम्या सकाळपासून येत होत्या. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा अहवाला दिला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, असा दावा केला आहे. त्याच वेळी शिवसेनेचा फक्त विधिमंडळ पक्ष फुटला आहे. रस्त्यावरचा पक्ष तसाच आहे. उलट सर्वसामान्य लोकांचा शिवसेनेला पाठिंबा वाढतो आहे, त्याबद्दल मी नागरिकांचे आभार मानतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचा प्रसार माध्यमांशी संवाद – LIVE https://t.co/xJSz2dy2mV — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 8, 2022
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचा प्रसार माध्यमांशी संवाद – LIVE https://t.co/xJSz2dy2mV
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 8, 2022
भाजप संदर्भात आपली जुनीच भूमिका मांडत भाजपने आत्ता जे केले शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले, तेच अडीच वर्षांपूर्वी केले असते तर ते सन्मानाने झाले असते. त्यासाठी हजार – दोन हजार कोटी रुपये खर्च करावे लागले नसते, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
– फुटीर आमदारांना टोला
शिवसेनेच्या फुटीर आमदारांना आजही मातोश्री विषयी प्रेम वाटते. याविषयी मी धन्यवाद देतो. पण मातोश्रीवर अतिशय विकृत भाषेत भाजपच्या नेत्यांनी आरोप केले. ठाकरे कुटुंबीयांना टार्गेट केले. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याच्या बाता केल्या, त्या भाजपबरोबर तुम्ही का गेलात?, याचा खुलासा करा असा टोमणाही उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लगावला.
– राष्ट्रपती निवडणुकीबाबत नंतर निर्णय
आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रश्न उत्तरे घेण्याचे टाळले त्याचबरोबर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका काय असेल?, यावर सर्व खासदारांशी आणि शिवसेनेच्या नेत्यांची चर्चा करून निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App