उद्धव ठाकरेंनी कुठूनही निवडणूक लढावी, त्यांच्याविरोधात मी लढायला तयार; नवनीत राणांचे आव्हान

प्रतिनिधी

अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी कुठूनही निवडून लढवावी, मी त्यांच्याविरोधात निवडणुकीत उभी राहीन, असे थेट आव्हान नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. Uddhav Thackeray should contest elections from anywhere

नवनीत राणा यांना निवडणुकीला उभे राहुद्या मग अहंकार काय? आणि कौन किस खेत की मूली हे कळेल, असे संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्यावर बोलत असताना नवनीत राणा म्हणाल्या की, ‘संजय राऊत माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे आहेत. तर मी त्यांना दादाच म्हणू शकते. दादा आजपर्यंत तुम्ही लोकांमध्ये जाऊन, लोकांची काम करून लोकांमध्ये राहून किती निवडणूका लढवल्या, त्याचे उत्तर त्यांनी पहिल्यांदा द्या. त्यामुळे मी त्यांना एवढेच सांगू इच्छिते, त्यांनी निवडणूक लढवावी. एक सच्चा कार्यकर्ता हा राऊतांचे डिपॉझिट जप्त करू शकतो, याची मला खात्री आहे.’


लव्ह जिहाद प्रकरणावरून नवनीत राणा आक्रमक; “मुलीचा शोध घ्या”, अमरावती पोलिसांना इशारा


नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, हो मी आरोपी आहे. मला आरोपी उद्धव ठाकरेंनी बनवले. हनुमान चालीसा म्हटली म्हणून जेलमध्ये टाकले आरोपी म्हणून. हनुमान चालीसा म्हटले म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. हे सगळे आरोप माझ्यावर आहेत, त्यामुळे मला आरोपी तुम्हीच बनवले आहे. यानंतरही देवाने माझी हिंमत तुटू दिली नाही, ते माझ्या पाठिशी उभे राहिले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवा, ज्या मतदारसंघातून तुम्ही उभे राहालं, त्या मतदारसंघातून मी तुमच्या विरोधात निवडणुकीला उभी राहिन. मला सुद्धा पाहायचे आहे, मातीमध्ये काम करणारा आणि लोकांसोबत राहून निवडणूक लढणारा व्यक्ती हा निवडून येतो की, मंचावर बसून केवळ भाषण करणारा आणि मातोश्रीमध्ये बसून फेसबुक लाईव्ह करणारा, निवडून येतो हे पाहायचे आहे.

Uddhav Thackeray should contest elections from anywhere

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात