ठाणे स्टेशनवरून रामभक्त अयोध्येल रवाना; मुख्यमंत्री शिंदे ९ एप्रिल रोजी जाणार
विशेष प्रतिनिधी
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज ठाण्यातून शेकडोच्या संख्येने रामभक्त अयोध्येला रवाना झाले आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वत: ठाणे स्टेशनवर आले होते. यावेळी त्यांच्यसोबत खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. Ayodhya is a matter of great faith, devotion and identity for us Chief Minister Eknath Shinde
याप्रसंगी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘’जवळपास ३ हजारांपेक्षा जास्त शिवसैनिक आणि रामभक्त हे उद्या आयोध्येत पोहचतील. प्रभू रामचंद्राचं दर्शन परवा सकाळी त्यांचं होईल. अतिशय उत्साह आणि जोश आपल्या या सर्व रामभक्तांमध्ये पाहायला मिळाला, म्हणून मी स्वत: आज त्यांना निरोप देण्यासाठी आणि भेटण्यासाठी आलो आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आपण पाहिलेला आहे. प्रभू रामचंद्राचं दर्शन आपल्याला कधी होतय, या आतूरतेनेच सर्व रामभक्त रवाना झाले आहेत.’’
उद्धव ठाकरेंनी कुठूनही निवडणूक लढावी, त्यांच्याविरोधात मी लढायला तयार; नवनीत राणांचे आव्हान
याचबरोबर ‘’अयोध्या हा आमच्यासाठी अतिशय श्रद्धेचा विषय आहे. आमच्या भक्तीचा विषय आहे आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्याचा जेव्हा योग येतो तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळातो. यावेळीचा उत्साह जास्त प्रमाणात आहे. लोकांना लवकरच तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे. त्यामुळे आमची सगळी रामभक्तांची टीम अयोध्येला रवाना झाली आहे.’’ असंही शिंदे म्हणाले.
https://youtu.be/hutePElOJUc
याशिवाय, ‘’पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली अयोध्येत भव्यदिव्य मंदिराचे निर्माण होत आहे. जे स्वप्न हिंदुहृदयसम्राट बाळासाहबे ठाकरे यांनी पाहिलं, की अयोध्येत जागतिक दर्जाचं भव्यदिव्य राममंदिर अशी खुद्द बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. मी पंतप्रधान मोदींना देशभरातली तमाम रामभक्तांच्यावतीने धन्यवाद देतो. त्यांचे आभार मानतो की जे स्वप्नवत वाटणारं, राम मंदिराचं काम लवकरच पूर्णत्वास जातय आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून जे सागाचं लाकूड लागणार आहे, ही देखील समस्त महाराष्ट्रातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे.’’ असंदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App