प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह होशियारी यांच्याशी राजकीय पंगा घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून बातचीत केल्यानंतर कायदेशीर बाबींचा उल्लेख करत अखेर विधानसभा अध्यक्षांची आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा निर्णय रद्द केला. Uddhav Thackeray – Sharad Pawar Discussion, Election of Assembly Speaker canceled after checking legal matters !!
या सर्व प्रकारात एकूण राज्यपालांशी घटनात्मक बाबींवर टक्कर घेणे एक प्रकारे महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला महागात पडले आहे. काल उद्धव ठाकरे यांनी जरूर राज्यपाल भगतसिंह होशियारी यांना खरमरीत पत्र लिहिले खरे. विधानसभेचे विधिमंडळाने केलेले कायदे तपासण्याचा राज्यपाल म्हणून तुम्हाला घटनात्मक अधिकार नाही, असे लिहिले खरे त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर शेरेबाजी केली. परंतु या सगळ्या गोष्टीचा काही उपयोग झाला नाही.
उलट राज्यपालांनी बंद लिफाफ्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आणि विधानसभा अध्यक्ष यांची सगळी निवडणूक बारगळली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर शरद पवार यांना फोन केला त्यांच्या कडून कायदेशीर बाबी समजावून घेतल्या आणि नंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक स्थगित केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App