उद्धव ठाकरे म्हणाले- विधानसभेमध्ये भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी नाहीच; राज्यातील कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. तोच धागा पकडून शरद पवारांनी मोदींना प्रतिटोला लगावत, ही भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा दिला.Uddhav Thackeray said- There is no joining hands with BJP again in the Legislative Assembly; Order to state workers to prepare

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा रौप्य महोत्सवी मेळावा अहमदनगर येथील न्यू आर्टस महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी झाला. महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी (पवार) मोठे शक्ती प्रदर्शन केले. विविध वक्त्यांच्या भाषणात आगामी विधानसभेत 85 आमदार निवडून आणण्याचा सूर आळवण्यात आला. पवार म्हणाले, राजकीय पक्षात एकमेकांवर टीका करताना मर्यादा असते. पण माझ्या बाबतीत पंतप्रधान बोलले की, मी भटकती आत्मा आहे. ते एका दृष्टिने बरोबर आहे, कारण आत्मा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात ते भारताचे नव्हे तर मोदीचे सरकार किंवा मोदी गॅरंटी म्हणायचे, आता मोदी गॅरंटी राहिली नाही. लोकशाहीच्या जोरावर मोदींना सागावे लागले, हे मोदी सरकार नाही तर भारत सरकार आहे.



ही भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही : शरद पवार

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ९ जागा मिळाल्याने ठाकरे गटात नवीन ऊर्जा आल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभेत भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सोमवारी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सांगितले. तसेच विधानसभेच्या तयारीला लागण्याचे निर्देशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पक्षाचे नेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची सोमवारी बैठक बोलावली. या वेळी निवडणुकीतील विजयाबरोबरच ज्या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांचा पराभवाची कारणेसुद्धा जाणून घेतली. शिवाय पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावाही घेतला. दरम्यान, ठाकरेंनी आपल्या शैलीत भाजपवर टीकास्त्र सोडले.

भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करा. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढताना आपण भाजपला हरवू शकतो हे दाखवून दिले आहे. दिल्लीश्वरांना यातून आपण एक चांगला संदेश दिला आहे. आगामी विधानसभा महाविकास आघाडी म्हणूनच लढायची आहे. या निवडणुकीतून भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करायचे आहे, त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी सामान्य शिवसैनिकालाच विराजमान करायचे आहे याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर मी स्वत: महाराष्ट्रात फिरणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक लवकर जाहीर करेन, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Uddhav Thackeray said- There is no joining hands with BJP again in the Legislative Assembly; Order to state workers to prepare

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub