Uddhav Thackeray राजकारणासाठी उद्धव ठाकरेंना हिंदुत्व आठवले, रवी राणा यांची टीका

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरावर रेल्वे विभागाने दिलेल्या नोटिसांवरून राजकीय वातावरण तापले आहे. यावर प्रतिक्रिया देताना अपक्ष आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राणा म्हणाले, “उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण फक्त राजकारणासाठी होते. हिंदुत्वासाठी त्यांचा काहीही खारीचा वाटा नाही. हिंदुत्व रक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असल्याने या ८० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक हनुमान मंदिराला कोणताही धक्का लागणार नाही.”

रेल्वे विभागाने मंदिर हटवण्यासंदर्भात दिलेली नोटीस आगामी काळात मागे घेतली जाईल, असा विश्वासही राणा यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवून सत्ता टिकवण्यावर लक्ष केंद्रित केले. मात्र, आता राजकीय स्वार्थासाठी त्यांना हिंदुत्वाची आठवण होत आहे.”

दादर हनुमान मंदिर हे केवळ धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. या प्रकरणावरून हिंदुत्वावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray remembered Hindutva for politics, Ravi Rana criticizes

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात