विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या बैठकीत जीएसटीबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. Uddhav Thackeray reacts sharply to GST arrears
महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के आहे.संपूर्ण देशात महाराष्ट्रातून सर्वात जास्त १५ टक्के जीएसटी गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी एकत्र केल्यास महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे तरीही महाराष्ट्राला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे, असे त्यांनी मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले.
तर देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर पंतप्रधान मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली. पण सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. पण कोरोनाचा मूळ मुद्दा बाजूला सारत मोदी यांनी इंधन दरवाढीवरून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांवर टीका केली.
गुजरात आणि कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र, पश्चिम बंगालने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा. मुंबईपेक्षा दीव दमणमध्ये पेट्रोल, डिझेल स्वस्त आहेत. पेट्रोल, डिझेलवरील कर केंद्र सरकारने कमी केले आहेत. भारत सरकारचा ४२ टक्के महसूल राज्यांना दिला जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या राज्याच्या आणि शेजारच्या राज्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App