कोल्हापूरच्या व्हिडिओ कॉन्फरन्स प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी काढला बाळासाहेबांच्या बंद खोलीतील चर्चेचा मुद्दा!!


प्रतिनिधी

मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रचारात सहभाग घेतला पण तो देखील अखेरच्या दिवशी आणि तेही व्हिडीओ कॉन्फरन्सच्या प्रचार सभेत…!!Uddhav Thackeray raises issue of Balasaheb’s closed room discussion in Kolhapur’s video conference campaign

या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या बंद खोलीत झालेल्या चर्चेचा मुद्दा काढला. भाजपवर खोटा हिंदुह्रदयसम्राट तयार करण्याचा आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचे नेते एकीकडे बाळासाहेबांविषयी आदर असल्याचे सांगतात पण बाळासाहेबांच्या ज्या खोलीला आम्ही मंदिर मानतो, त्या खोलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला शब्द मात्र पाळला नाही. युती मध्ये त्यांनीच बिब्बा घातला, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.



महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा त्यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला. भारतीय युद्धाच्या इतिहासातील गौरव असलेल्या विक्रांत युद्धनौकेच्या बचावासाठी गोळा केलेला निधी किरीट सोमय्या यांनी खाल्ला आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्या यांचे समर्थन करत आहेत, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.

फडणवीसांचा दोन दिवसांचा प्रचार दौरा; ठाकरेंचा व्हिडीओ कॉन्फरन्स प्रचार!!

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज रामनवमीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेरीस हजेरी लावली, पण अर्थातच व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे…!! प्रत्यक्षात ते कोल्हापूरला आले नाहीत.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र भाजप उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम प्रचारासाठी दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा केला. काल त्यांनी मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले तसेच आज अंबाबाई दर्शन आणि श्रीराम दर्शन घेऊन पत्रकार परिषदेला देखील संबोधित केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भाग घेतला. आम्ही हिंदुत्व विसरलो नाही. विसरणार नाही. पण विरोधकांचा खोटं बोलण्याचा एकमेव कार्यक्रम आहे. त्यामुळे ते शिवसेनेवर हिंदुत्व विसरल्याचा आरोप करत आहेत, असे शरसंधान उद्धव ठाकरे यांनी साधले.

याआधी देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना नेत्यांनी उर्दू कॅलेंडर छापून जनाब बाळासाहेब ठाकरे असा केल्याची आठवण करून दिली होती. बाळासाहेबांचा उल्लेख “जनाब” असा करून आणि अजान स्पर्धा भरवून शिवसेना छद्म धर्मनिरपेक्ष झाली, असे टीकास्त्र सोडले होते.

देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना हिंदुत्व विसरली नाही. विसरणार नाही पण मर्यादा पाळून नक्की काम करेल. शिवसेनेला भाजपच्या नेत्यांनी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Uddhav Thackeray raises issue of Balasaheb’s closed room discussion in Kolhapur’s video conference campaign

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात