मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुधवारी सायंकाळी फेसबुक लाईव्ह मधून शिवसेनेचा अनोखा राजकीय प्रवास उलगडून दाखवला. सन 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर शिवसेना कोणत्या वळणाने गेली, याचा सर्वसाधारण आढावा त्यांनी घेतला. पण त्याचवेळी 2014 ते 2022 या काळात शिवसेनेचा राजकीय प्रवास हा “खिशातले राजीनामे” ते “टेबलावरचा राजीनामा” इथपर्यंत आणून ठेवल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून आले!! Uddhav Thackeray only offered resignation but actually didn’t give it
2014 मध्ये याच शिवसेनेने तुम्हाला मंत्री केले
2019 मध्ये आपल्याला वेगळा मार्ग पत्करावा लागला तेव्हाही तुम्हाला मंत्री केले, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सकट बंडखोर आमदारांना डिवचले. पण 2014 पासून 2019 पर्यंत शिवसेनेचे सगळे मंत्री आपल्या खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. प्रत्यक्षात त्यांनी राजीनामे कधीच दिले नव्हते, हे मात्र उद्धव ठाकरे यांनी आवर्जून सांगितले नाही!!
शिवसेनेच्या याच मंत्र्यांचे अनुकरण करत 22 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा खिशात ठेवला नाही, तर तो वर्षा बंगल्यातल्या टेबलावर ठेवला. आपल्या स्वतःला कोरोना झाल्यामुळे आणि आपण “वर्षा” बंगला सोडत असल्यामुळे हा टेबलवरचा राजीनामा बंडखोर आमदारांनी स्वतःहून पुढे येऊन तो राज्यपाल महोदयांकडे घेऊन जावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी करून बंडखोर आमदारांना पेचात पकडले आहे.
– राजीनाम्याची हूल
अर्थात एक प्रकारे राजीनाम्याची हूल देऊन 2014 ते 2019 शिवसेनेचे अनेक नेते जसे मंत्रीपदावर राहिले होते, तशीच राजीनाम्याची हूल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह मधून दिल्याचे दिसून आले आहे. त्यांनी फक्त मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची हूल दिली असे नाही, तर सरळ सरळ त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख पदाच्या राजीनाम्याची देखील हूल दिली आहे!!
– आमदारांच्या मूळ मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता
ज्या मुळात बंडखोर आमदारांची मागण्याच नाहीत, त्या मागण्यांवर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह मधून जोरदार भाषण केले. एकनाथ शिंदे यांच्या सकट सगळ्या बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलेला नाही. त्याच प्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा राजीनामा मागितलेला नाही.
आमदारांच्या निधीबाबत मौन
एकनाथ शिंदे यांच्या सकट बंडखोर आमदारांच्या फक्त दोन मागण्या आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी तडजोड करा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची संबंध तोडा निधी बाबतचा शिवसेना आमदारांवरचा अन्याय दूर करा. मात्र, नेमक्या या मागण्यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मधून सरळ सरळ वाटाण्याच्या अक्षता लावून टाकल्या आहेत.
– काँग्रेस – राष्ट्रवादीवर जास्त प्रेम
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याविषयी आपले प्रेम कमी होणार नाही. त्यांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. परंतु, आपल्याच शिवसेनेच्या आमदारांनी अविश्वास दाखवला आहे, असे सांगत त्यांनी बंडखोर आमदारांना डिवचले आहे. याचे परिणाम लवकरच दिसून अपेक्षित आहे.
– राजीनाम्याच्या परंपरेचे पाईक
पण त्याचबरोबर 2014 पासून शिवसेनेने सुरू केलेली खिशातल्या राजीनाम्याची परंपरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 जून 2000 22 रोजी टेबलावरच्या राजीनामा पर्यंत आणून ठेवले आहे ही वस्तुस्थिती मात्र विसरता येणार नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App