विशेष प्रतिनिधी
मुंबई : कुठल्याही स्थितीत मुख्यमंत्रिपद पाहिजेच, असा हट्ट नसल्याचे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांनी ही मागणी अजिबात सोडलेली नाही, असे मविआच्या जागावाटप बैठकीत स्पष्ट झाले. मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसपेक्षा 10 जागा कमी घेण्याची तयारी उद्धवसेनेने जागावाटप बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी दाखवली.
काँग्रेसने 105, उद्धवसेनेने 95 आणि शरद पवार गटाने 88 जागा लढवाव्यात असा प्रस्ताव त्यात मांडला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत जागावाटपावर चर्चा झालीच नाही, असा दावा केला. आणखी दोन दिवस हे बैठकांचे सत्र चालणार आहे. दरम्यान, बैठकीला येण्यासाठी काँग्रेसचे राज्यातील नेते तयार नव्हते. त्यामुळे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीकाही केली होती.
मविआतील नेत्यांनी 288 जागांचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये काँग्रेस विदर्भात मजबूत स्थितीत आहे. उद्धवसेना मुंबईसह कोकणात तर राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आपली ताकद दाखवण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये मविआलच बहुमत मिळेल, असे प्रास्ताविक करून सुरूवात झाली. काँग्रेसने 115 जागांवर दावा केला आहे. मात्र, राहुल गांधींच्या आदेशानुसार ते 105 जागांवर थांबतील, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे नेते फारच व्यग्र, तारखांवर तारखा देत आहेत जागा वाटप बैठकीची तारीख, वेळ, ठिकाण आधी कळवूनही काँग्रेसचे नेते वेळेवर पोहोचले नाही. त्यामुळे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष सध्या खूप व्यग्र आहे, तरीही आम्ही हे संपवावे, यासाठी आज त्यांना बोलावले. तरीही ते तारखांमागून तारखा देत आहेत.
उद्धवसेना पुन्हा एकदा आक्रमक
सूत्रांनुसार, 6 ते 8 ऑगस्टदरम्यान उद्धव यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. मुख्यमंत्रिपदासाठी माझाच चेहरा द्यावा, अशी मागणी केली. त्यावर प्रचारात ही बाब समोर आणली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची घाई नाही, असे म्हटले. त्यामुळे शांत झालेली उद्धवसेना या बैठकीत आक्रमक झाल्याचे दिसले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App