विशेष प्रतिनिधि
मुंबई : महाविकास आघाडीमधील नेते कितीही एकमेंकांच्या गळ्यात गळा घालत असले तरी कार्यकर्त्यांना मात्र ही अनैसर्गिक आघाडी पटत नसल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे. प्रामुख्याने उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray )गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात धास्ती असून शरद पवार आणि काॅंग्रेस ठाकरेंचा वापर करून त्यांना फेकून देतील अशी भीती आहे. एका शिवसैनिकाने पत्र लिहून उध्दव ठाकरेंना इशारा दिला आहे.
एका शिवसैनिकाने उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार मिलिंद नार्वेकर यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसबद्दल थेट संशय व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीतील इतर पक्ष शिवसेना ठाकरे गटाचा फक्तं प्रचारासाठी वापर करून घेतील. स्व:ताच्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणत, पुन्हा जे लोकसभा निवडणुकीत घडलं तेच आता विधानसभा निवडणुकीतही घडेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गटाला मागे टाकेल, अशा इशारा या पत्रात दिला आहे.
या पत्रात म्हटले आहे की, मिलिंद भाई, जर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल महाविकास आघाडी तरच उद्धव साहेबांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीसाठी प्रचारप्रमुख म्हणून कार्य करावे अन्यथा फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा. जेणेकरून आपल्या प्रत्येक उमेदवारावर त्यांचं लक्ष राहील आणि आपले शिवसेनेचे मशालीचेच जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि त्याच्या भरवशावरच आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल व महाविकास आघाडीतील दुसऱ्या अन्य घटक पक्षांची उगाचच प्रचार प्रसिद्धी करण्यात काही अर्थ नाही.
लोकसभेला तसे केल्याने आपल्या जागा कमी झाल्या व काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा झाला. त्यामुळे ते उगाचच प्रचार प्रमुखाची माळ गळ्यात घालतील आपल्या आणि त्यांचा फायदा करून घेतील… मुख्यमंत्रीपदाची ऑफर महाविकास आघाडी न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे. यातून त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे. त्यामुळे आपण देखील सावध राहून एकत्रित जेव्हा सभा होतील तेव्हाच एकत्र प्रचारासाठी जावे अन्यथा आपल्या उमेदवारांचा आपण प्रचार प्रत्येकाने आपल्या पक्षाने प्रचार करावा असं ठरविण्यात यावे आणि तिच रणनिती ठेवावी.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App