सुनावणीची बतावणी, उद्धव सेनेकडून सुप्रीम कोर्टाची खिल्ली!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मूळ शिवसेना हे नाव कोणाला आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला या विषयाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली परंतु ती आज पूर्ण होऊ शकली नाही सुप्रीम कोर्टाने त्यासाठी 21 जानेवारीची तारीख दिली. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुनावणीची बतावणी असे म्हणून सुप्रीम कोर्टाची खिल्ली उडवली. Uddhav Sena

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या दोन शिवसेनेच्या वादाची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केले त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 21 जानेवारीला या विषयाची अंतिम सुनावणी घेऊ, असे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या चिन्हाची सुद्धा सुनावणी झाली‌. परंतु, ती सुद्धा पूर्ण होऊ शकली नाही.



या सुनावणी संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सोशल मीडिया अकाउंट वरून आजच्या सुनावणीची खिल्ली उडवली. सुनावणीची बतावणी असा तमाशातला शब्दप्रयोग त्यांनी त्यासाठी वापरला. सुनावणीची बतावणी सुरू आहे. प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल. यावर आमचा विश्वास आहे, असे उद्धव ठाकरे यांचे उद्गार शिवसेनेने आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केले.

पण शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादींकडून त्यांच्या वादा संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या बाहेर आज तरी कुठल्या प्रतिक्रिया आल्या नाहीत.

Uddhav Sena mocks Supreme Court

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात