शरद पवारांना भाजपच्या दोन ऑफर्स; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा


प्रतिनिधी

मुंबई : शरद पवार अजित पवार गुप्त भेटीनंतर प्रचंड अस्वस्थ झालेल्या काँग्रेस नेत्यांनी वेगवेगळे दावे सुरू केले आहेत. यापैकी एक गंभीर दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. भाजपने शरद पवार यांना अजित पवार यांच्या माध्यमातून या दोन मोठ्या ऑफर्स दिल्या आहेत. केंद्रात कृषिमंत्री पद आणि नीती आयोगाचे अध्यक्षपद तसेच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांना सत्तेत सामावून घेण्याचे आश्वासन अशा या दोन ऑफर्स असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.Two offers of BJP to Sharad Pawar; Prithviraj Chavan’s claim

या संबंधीची बातमी फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. भाजपने शरद पवार यांना केंद्रीय कृषिमंत्री पद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली आहेच. माझ्या माहितीनुसार, शरद पवार यांनी अजितदादांनी दिलेली ही ऑफर नाकारली आहे, असा “गौप्यस्फोट” पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादीत बंड केलं. त्यानंतरही अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी संवाद कायम ठेवला आहे. शनिवारी संध्याकाळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. ही तिसरी भेट होती. ही भेट संवाद सुरू असल्याच्या प्रक्रियेचाच एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे.

सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनाही ऑफर

पृथ्वीराज चव्हाण यांनी या ऑफरवर आणखी माहिती दिली आहे. जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही सत्तेत सामावून घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. अजितदादा हे नुकतेच दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांनी अजितदादांना शरद पवार यांना हा प्रस्ताव देण्यास सांगितल्याचे समजते.

पवारांनीच ठरवावं

शरद पवार आणि अजितदादा यांच्यातील भेटीवरून शिवसेनेत नाराजी आहे. काँग्रेसलाही या भेटी मंजूर आहेत काय? असा सवाल चव्हाण यांना करण्यात आला. त्यावर, या बैठकींची किती गरज आहे, याचा निर्णय शरद पवार यांनीच घ्यायचा आहे, असं चव्हाण म्हणाले.

Two offers of BJP to Sharad Pawar; Prithviraj Chavan’s claim

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात