विशेष प्रतिनिधी
परभणी : परभणीत ७६ किलो गांजासह दोघांना ताब्यात घेतले आहे. दहशतवादविरोधी पथकाची गस्तीवेळी ही कारवाई केली आहे. दहशतवादविरोधी पथकाने ७६ किलो १०० ग्रॅम गांजासह ७ लाख ८९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Two arrested with 76 kg of cannabis in Parbhani; Anti-terror squad patrol action
पोलिस पथकाने शेख अकबर शेख रजाक, अक्रम आयुब पठाण या दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक जयंत मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विश्वास खोले, पोलिस अमलदार सय्यद जाकेर, अझर पटेल, राठोड, रामकिशन काळे, भारत नलावाडे, जावेद खान, अरुण कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App