महाराष्ट्र शासन, NSE आणि ‘मनी बी’ यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार

राज्यात आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) व मनी बी यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, ‘मनी बी’च्या संचालक शिवानी दाणी वखरे, ‘एनएसई’चे श्रीराम कृष्णन आदी उपस्थित होते. Tripartite Memorandum of Understanding between Government of Maharashtra NSE  and  Money Bee

या त्रिपक्षीय कराराच्या माध्यमातून राज्यात आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, “आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे. या दृष्टीने लाखो लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे. सायबर फसवणूकीपासून वाचणे, पाँझी योजनाबद्दल जागरूकता, गुंतवणूक कशी व कुठे करायची, या संबंधीचे मार्गदर्शन या कराराअंतर्गत होणार आहे.”

याचे मिळणार प्रशिक्षण –

सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे मिळवावे?, शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी?, आर्थिक गुंतवणुकीची खबरदारी कशी घ्यावी?, सिक्युरिटीज मार्केटबद्दल जागरूकता आणि सुरक्षितता वाढवणे आदींबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Tripartite Memorandum of Understanding between Government of Maharashtra NSE  and  Money Bee

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात