विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजकारणातील खेळ हे कल्पनाशक्तीच्या बाहेरचे असतात. याची प्रचीती 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांकडे पाहिली तर लक्षात येईल. भाजपचं पारडं जड होते न होते तोवर बाजी कशी काय पलटली आणि एक वेगळाच इतिहास रचला गेला होता. साताऱयातून उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे साताराची जागा राखणे हे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक प्रतिष्ठेची बाब बनली होती. याच काळामध्ये राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. अशावेळी कमकुवत परिस्थितीवर मात करत शरद पवार यांनी भर पावसात सभा घेऊन एक अनपेक्षित इतिहास घडवला होता.
Today completes two years since that meeting held by honorable sharad pawar in heavy rain
18 ऑक्टोबर 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी साताऱ्यामध्ये एक सभा घेतली होती. असं म्हणतात की, या सभेमुळे राज्यांमध्ये एवढा मोठा राजकीय बदल घडून आला होता. कारणही तसंच होतं. कारण शरद पवार यांनी पावसामध्ये भिजत ही सभा घेतली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरणात जणू बदलून गेले होते. पवारांच्या या ऐतिहासिक सभेला आज बरोबर दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी ही आठवण आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
आदरणीय @PawarSpeaks साहेब साताऱ्यातील तुमची ही सभा जिद्दीने लढण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीतही यश खेचून आणण्यासाठी अखंड संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील!#द्विवर्षपूर्ती#सातारासभा pic.twitter.com/w6RSX71ttc — Rohit Pawar (@RRPSpeaks) October 18, 2021
आदरणीय @PawarSpeaks साहेब साताऱ्यातील तुमची ही सभा जिद्दीने लढण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीतही यश खेचून आणण्यासाठी अखंड संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील!#द्विवर्षपूर्ती#सातारासभा pic.twitter.com/w6RSX71ttc
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 18, 2021
Fadnavis On Sharad Pawar : पवारांचे देशमुखांबाबत वक्तव्य दिशाभूल करणारे, फडणवीसांनी दिला ‘हा’ पुरावा
शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी या सभेचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याला त्यांनी कॅप्शन दिले आहे की, आदरणीय पवारसाहेब साताऱ्यातील तुमची ही सभा जिद्दीने लढण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीतही यश खेचून आणण्यासाठी अखंड संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील.
राज्याचे गृहमंत्री राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील या सभेच्या काही आठवणी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे शेअर केल्या आहेत. भर पावसात उभे राहून 80 वर्षांच्या एका योध्याने वातावरण फिरवलं होतं. होय, आमच्या साहेबांनी 106 जणांना घरी बसवलं होतं. असं देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App