सपकाळ यांचे हे सोंग साऱ्या महाराष्ट्राला आता कळून चुकले आहे, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘Bawankule ‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. दिल्लीतील नेत्यांना विशेषतः राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी सपकाळ यांनी हे अविवेकी आणि बेताल विधान करून महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा अपमान केला आहे.” अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.Bawankule
तसेच बावनकुळे यांनी म्हटले आहे की, ” काँग्रेसचे हे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष स्वतःला गांधीवादी म्हणवून घेतात, महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात जाऊन ध्यानस्थ बसतात आणि दुसरीकडे गांधीजींच्या मूल्यांना तिलांजली देणारे वक्तव्य करतात. सपकाळ यांचे हे सोंग साऱ्या महाराष्ट्राला आता कळून चुकले आहे.”
याशिवाय ”आमचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधायक आणि रचनात्मक कार्यातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पना ते पुढे नेत आहेत. असे असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना क्रूरकर्मा औरंगजेब्याशी करून छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे.” असा आरोप बावनकुळेंनी केला आहे.
याचबरोबर ”अनेक वर्षे महाराष्ट्राबाहेर राहिलेल्या आणि अलीकडेच दिल्लीतून थेट राज्यात आलेल्या नवशिक्या सपकाळ यांना देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती असण्याचे काहीच कारण नाही. त्यांनी आपल्या पक्षातील राज्यातील ज्येष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा केली असती तर असे संतापजनक विधान करण्यास ते धजावले नसते.” असं म्हणत बावनकुळे यांनी सपकाळ यांच्यावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App