विशेष प्रतिनिधी
मुंबई : अतिवृष्टीग्रस्ताना सरकार पोकळ आश्वसने देत आहे. प्रशासन सुस्त आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी आणि प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी मी आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात आहोत, असे भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.To open eyes of the Government and administration l am On the tour of vidarbha and marathwada : Devendra Fadnavis
फडणवीस म्हणाले, अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. परिसरातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी आमचा हा दौरा आहे. प्रशासनाचे डोळे उघडून , राज्य सरकारच्या हवेत विरणाऱ्या आश्वासनांना अस्तित्वात आणण्यासाठी आमचा दौरा आहे, असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App