उध्दवजी, दीड वर्षांतील पराक्रम पाहता अनेक गोष्टींवर खंत वाटण्याची गरज आहे, चंद्रकांत पाटील यांची टीका

अहो उद्धवजी, राज्यात तुमचे दीड वषार्तील पराक्रम पाहता तुम्हाला खरंतर अनेक गोष्टींवर खंत वाटण्याची गरज आहे ! अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.Uddhavji, looking at the achievements of the last one and a half years, there is a need to grieve over many things, said Chandrakant Patil


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अहो उद्धवजी, राज्यात तुमचे दीड वषार्तील पराक्रम पाहता तुम्हाला खरंतर अनेक गोष्टींवर खंत वाटण्याची गरज आहे ! अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले होते की, आपण पोलीस अधिकाºयांना ओळखण्यात कमी पडलो, आपल्याला त्यांच्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. यावरून पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.पाटील म्हणाले, राज्यातील शेतक?्यांशी उद्धव ठाकरे यांचं काय वैर आहे देव जाणे? शेतकरी ठाकरे सरकारच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे. शेतकऱ्याना आपली व्यथा सरकारच्या दारी मांडून मदतीची याचना करण्याऐवजी त्यांना जीव देणं जास्त सोपे वाटतंय, तुम्हाला याची खंत वाटत नाही का? केवळ आपला अहंकार सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही मुंबईच्या मेट्रोचा खेळखंडोबा केला.

मुंबईतील चाकरमान्यांना दिवसभर काम करून पुन्हा त्याच वाहतूक कोंडीचा नाहक त्रास तुमच्यामुळे सहन करावा लागतोय, तुम्हाला याची खंत वाटत नाही का ? करोना महामारीमुळे आधीच आर्थिक विवंचनेत असणाºया गोरगरीब जनतेला दिलासा देण्याऐवजी तुमच्या सरकारने त्यांना वाढीव वीजबिलाचा झटका दिला आणि ते भरू न शकणाऱ्या गोरगरीब जनतेचे वीज कनेक्शन खंडित केले. या मोगलाईची तुम्हाला खंत वाटत नाही का?

या सरकारला विदर्भ-मराठवाड्याचा एवढा द्वेष का आहे? असा सवाल करून चंद्रकांत पाटील म्हणाले, विदर्भ- मराठवाडा महाराष्ट्राचा भाग नसल्यासारखे तुमचे सरकार वागत आहे. विदर्भ-मराठवाडा वैधानिक महामंडळ ते सर्वच प्रकारच्या विकासाच्या बाबतीत या सरकारने विदर्भ-मराठवाड्यावर अन्याय केला.

तुम्हाला याची खंत वाटत नाही का? मराठा समाजाला अथक परिश्रमाने मिळालेले आरक्षण उद्धव ठाकरे तुम्ही आपल्या कर्मदरिद्रीपणामुळे गमावले. अनेक मराठा तरुण-तरुणी तुमच्या या मूर्खपणाची शिक्षा भोगत आहेत. तुम्हाला याची खंत वाटत नाही का? राज्यात दिवसागणिक महिला अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत.

तुमच्या सरकारमधील मंत्र्यांवरच महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत. तुम्ही स्वत: एका मंत्र्याची या आरोपामुळे मंत्रिपदावरून गच्छन्ति केली आहे. राज्य महिला अत्याचाराचे विक्रम रचत आहे, तुम्हाला याची खंत वाटत नाही का?

Uddhavji, looking at the achievements of the last one and a half years, there is a need to grieve over many things, said Chandrakant Patil

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*