शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या ठाण्यातील राजकीय संस्कृतीला गुंडगिरीचे गालबोट असल्याचे सांगितले जाते. याचाच फटका कोरोना काळात सर्वसामान्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांनाही बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाण्यातील राजकीय जाचाला कंटाळून एका डॉक्टरांनी चक्क तीस झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.Tired of political bullying, Dr. of ‘One Rupee Clinic’. Ghule attempted suicide in Thane?
विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाण्यातील ‘वन रुपी क्लिनिक’चे डॉ. राहुल घुले यांनी झोपेच्या तब्बल ३० गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे बुधवारी (ता. 23) समोर आले. सुदैवाने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील राजकीय एजंट पैशांची मागणी करुन छळ करत आहेत. त्यांच्यापासून माझ्या जिवाला धोका असल्याची तक्रार डॉ. घुले सातत्याने करत होते. मात्र त्याची दखल पोलिसांनी अथवा राज्यकर्त्यांनी घेतली नाही.
अखेर राजकीय गुंडांच्या जाचाला कंटाळून डॉ. घुले यांनी वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासामुळेच आत्महत्या करावी अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचेही ट्वीट त्यांनी केले. यामुळे ठाण्यातील राजकारणात खळबळ उडाली असून वैद्यकीय व्यवसायात घबराट पसरली आहे.
ठाणे महापालिकेने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दवाखाना सुरू केला. त्याचे काम मेडिंगो या कंपनीला देण्यात आले. मात्र या कंपनीला हे काम न झेपल्याने त्यांनी वन रुपी क्लिनिकच्या डॉ. राहुल घुले यांच्या मदतीने ठाण्यात 25 ठिकाणी दवाखाने उघडले.सहा महिने झाल्यानंतरही या दवाखान्यांच्या कामाचे बिल डॉ. घुले यांना अदा करण्यात आले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींना कंटाळून डॉ. घुले यांनी काही दिवसांपूर्वीच ठाण्यातले आपल्या सर्व दवाखाने बंद केले.
नुकत्याच 22 जुनच्या रात्री डॉ. घुले यांनी पुन्हा ट्वीट करून राजकीय एजंट आपल्याकडून वारंवार पैशाची मागणी करीत असल्याचे स्पष्ट केले. दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी काही एजंटांची नावेसुद्धा जाहीर केली. त्यांच्या या दोन्ही ट्वीटमुळे ठाण्यात चांगलीच खळबळ माजली. तरीही शिवसेना व राष्ट्रवादीच्या स्थानिक राज्यकर्त्यांनी तसेच पोलिस प्रशासनाने या संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही.
राजकीय गुंडांकडून छळ चालूच राहिल्याने या मानसिक त्रासाचा कंटाळा आला असून, आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे डॉ. घुले यांनी ट्वीट करुनच सांगितले. एवढेच नव्हे तर झोपेच्या 30 गोळ्या खावून आत्महत्या करीत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यानंतर त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या ते घरी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App