प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचा आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक होणार आहेत. पुढच्या आठवड्यात ते आणखी तीन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.Three more ministers from the Mahavikas Aghadi on Kirit Somaiya’s radar; Scams out
एवढेच नाही तर किरीट सोमय्या हे १० नोव्हेंबर रोजी एका मंत्र्याविरोधात तक्रार देखील दाखल करणार आहेत त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या रडारवर महाविकास आघाडीचे ते तीन नेते कोण, असा सवाल आता उपस्थित होतो आहे. ८ आणि ९ नोव्हेंबरला दिल्लीत आयकर विभाग, सीबीडीटी, ईडी आणि सहकार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचीही ते भेट घेणार आहेत.
सध्या किरीट सोमय्या हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकरणे उघडकीस आणत असतानाच त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणतात, मी ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आयकर विभाग CBDT, ED, सहकार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
I will be meeting Officials of Income Tax Dept CBDT, ED, Cooperation Ministry…. at Delhi on 8 & 9 November & file Complaint at Mumbai on 10 November against Thackeray Sarkar Minister… This will be First of the 3 Expose I am to made in next couple of weeks. @BJP4India — Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) November 6, 2021
I will be meeting Officials of Income Tax Dept CBDT, ED, Cooperation Ministry…. at Delhi on 8 & 9 November & file Complaint at Mumbai on 10 November against Thackeray Sarkar Minister…
This will be First of the 3 Expose I am to made in next couple of weeks. @BJP4India
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) November 6, 2021
१० नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकारचे मंत्री यांच्या विरोधात मुंबई येथे तक्रार दाखल करणार. पुढील काही आठवड्यांत ज्या ३ मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार, त्या पैकी हा पहिला खुलासा, अँक्शन, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App